लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शासकीय मका खरेदी केंद्रावर मका मोजमाप होत नसल्याने शे तकरी त्रस्त झाले होते. ही बाब शेतकर्यांनी निदर्शनास आणून देताच शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी खरेदी केंद्रावर धडक देत उपस्थित अधिकार्यांशी चर्चा करीत सदर मोजमाप सुरू करण्यास भाग पाडले. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मका खरेदी सुरू होऊन शे तकर्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील शासकीय मका खरेदी केंद्रावर दिसून आले.जवळपास ४ ते ५ दिवसांपासून शेतकर्यांनी शासकीय मका खरेदी केंद्रावर मका विक्रीस आणला आहे. असे असतानाही दुपारचे १ वाजले तरी मक्याचे मोजमाप मात्र सुरू करण्यात आले नाही. ही बाब काही शेतकर्यांनी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविली असता, विजय साठेंसह तालुका उपप्रमुख विनायक जवरे, जगन रायपुरे, ओंकारसिंह डाबेराव, सुरेश अहिर, एकनाथ डोसे, श्रावण पाटील आदी पदाधिकार्यांनी थेट शासकीय मका खरेदी केंद्रावर धडक दिली.यावेळी मका खरेदी केंद्रावर ताटकळत उभे असलेल्या शेतकर्यांशी शिवसेना पदाधिकार्यांनी संवाद साधला. दरम्यान, या खरेदी केंद्रावर उद्भवत असलेल्या अडचणींबाबत शेतकर्यांनी पदाधिकार्यांना अवगत करून दिले. यानंतर विजय साठे यांनी उपस्थित केंद्रप्रमुख सुरेश झनके यांच्याकडे जाब विचारत आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, सकाळपासून बंद असलेले मोजमाप केंद्रावर सुरू करण्यात आले. यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला.
शेतकर्यांना दिलासासदर शासकीय मका खरेदी केंद्रावर शेतकरी मोठय़ा प्रमाणात मका विकण्यासाठी आणत असताना खरेदीस विलंब केला जात आहे. त्यामुळे शे तकर्यांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. हा प्रकार रोजचाच झाला होता. अखेर शिवसेनेच्या हिसक्याने खरेदी सुरळीत झाली.