धाड : पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या चांडोळ येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत रविवारी एकास अटक केली आहे.
मागील काही दिवसांपासून धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही गावांत खुलेआमपणे देशी दारूची विक्री व वाहतूक होत आहे. दरम्यान, रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाला चांडोळ येथे अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा मारत आरोपी प्रदीप रमेश देशमुख (२४, रा. चांडोळ) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी दारूच्या ४६ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सुमारे अडीच हजार रुपये किमतीची ही दारू जप्त केली आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येथे कारवाई करते, मात्र धाड पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. याप्रकरणी ग्रामीण भागात होत असलेल्या अवैध दारू विक्रीसह अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या दारूच्या बाटल्या या कोणत्या परवानाधारक दुकानातून गेलेल्या आहेत, याचाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने शोध घेण्याची गरज आहे.