बुलडाणा : सकल मराठा समाज्यावतीने पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंद आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळत असून संपूर्ण जिल्ह्यात कडकडती बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान, सकाळीच नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे बाहेर पडून या बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे पहाटेपासूनच बंदला चांगला प्रतिसाद मिळत होतो. अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र बंद शांतते सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह या मुद्द्यावर औरंगाबाद येथे मराठा तरूणाने जलसमधी घेऊन जीवनयात्रा संपविल्याच्या घटनेच्या पृष्ठभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने २४ जुलै रोजी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास जिल्ह्यात व्यापक प्रतिसाद मिळत आहे. बुलडाणा जिल्ह्यात घाटावर बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मेहकर, मोताळासह घाटाखालील तालुक्यातही या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुलडाणा शहरात सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुषंगाने व्यापारी व नागरिकांनीही प्रतिसाद देत हा बंद पाळला आहे. दरम्यान, दुपारीही दोन वाजता स्थानिक संगम चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने बंद संदर्भात आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बंद दरम्यान, घाटावरील भागात कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. बुलडाणा शहरात सकाळी भरलेल्या काही शाळांना लवकर सुटी देण्यात आली. मेहकर येथेही पहाटेच आंदोलन सुरू झाले. जानेफळ मध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत असून तेथे रास्ता रोकोही करण्यात आला. मेहकर बसस्थानकावरून परिस्थिती पाहता बसगाड्या सोडण्यात आल्या नाहीत. सकाळी भरलेल्या काही शाळांना बंदच्या पृष्ठभूमीवर सुटी देण्यात आली. दरम्यान, ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना घरी परत जाण्यासाठी मेहकर आगाराने बसगाड्या सोडाव्यात अशीही मागणी येथे बंद दरम्यान करण्यात आली. डोणगाव येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. लोणार तालुक्यातही शाळा, महाविद्यालयांना बंदच्या पृष्ठभूमीवर सुटी देण्यात आली असून येथेही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र एसटीची वाहतूक येथे सुरळीत सुरू आहे. देऊळगाव राजा तालुक्यातही बंदला उत्तम प्रतिसाद मिळत असून येथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बसगाड्याही तुरळक प्रमाणात धावत आहे. संयम व शांततेत्या मार्गाने बंद पाळल्या जात आहे. सिंदखेड राजा येथेही बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून बसगाड्या मात्र सुरू आहेत. चिखली शहर व तालुक्यातही हा बंद कडकडीत पणे पाळण्यात येत असला तरी अत्याश्यक सेवांना यामध्ये सुट देण्यात आली असून या सेवा सुरू आहेत. मोताळा तालुक्यातही बंद पुकारण्यात आलेला असून दुपारी निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. धाड येथे बंदला प्रतिसाद असून मराठवाड्यातून येणार्या बसगाड्या बंद असल्याने येथील प्रवासी वाहतूक प्रभावीत झाली. दरम्यान, अपवाद वगळता जिल्ह्यात बंद दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. एसटी बसगाड्या बंद पोलिसांनी दिलेल्या सुचनेनंतर बुलडाणा आगारातून होणारी बस वाहतूक सकाळी दहा वाजल्यानंतर बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा वाहतूक अधिकारी कच्छवे यांनी दिली. बुलडाणा आगारातून जवळपास दररोज ७५ शेड्यूल धावतात. त्यावर या बंदचा विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील अन्य सहा ते सात आगारातून बस गाड्या सोडण्यात येत असल्या तरी परिस्थीनुरुप बसगाड्या बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
Maratha Kranti Morcha : बुलडाणा जिल्ह्यात कडकडीत बंद; बस वाहतूक प्रभावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:29 PM
बुलडाणा : सकल मराठा समाज्यावतीने पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंद आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळत असून संपूर्ण जिल्ह्यात कडकडती बंद पाळण्यात येत आहे.
ठळक मुद्देमेहकर बसस्थानकावरून परिस्थिती पाहता बसगाड्या सोडण्यात आल्या नाहीत. बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मेहकर, मोताळासह घाटाखालील तालुक्यातही या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुलडाणा शहरात सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते.