शेगाव - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेगावात रास्तारोको करण्यात आला. शहरात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शेगाव येथील शिवाजी चौकात सकल मराठा समाज बांधव एकत्रित येऊन महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाले आहेत.
यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच ''मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. जय भवानी, जय शिवराय''अशी घोषणाबाजीही करण्यात आली आहे.