लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने जळगावमध्ये आज २४ जुलै रोजी मराठा तरूणांनी रास्ता रोको केला. यावेळी मुक्ताईनगर आणि जळगाव जामोद आगाराच्या दोन एसटी बसच्या काचा फोडल्या तर शहरातील शाळा कॉन्व्हेंट आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली. तर दुकाने व बाजारपेठ बंद केल्यानंतर व्यापारी संघटनेच्या आवाहनाने पुन्हा उघडण्यात आली. तर याबाबत नियोजन करून उद्या जळगावात बंद ठेवण्यात येईल असे मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी पिंपळगाव काळे, आसलगाव आणि जळगाव येथून ४८ कार्यकर्त्यांना अटक करून दुपारी त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी पराग अवचार, गजानन अवचार, जितेंद्र देशमुख, गणेश गावंडे, भिमराव पाटील, प्रकाश गावंडे, दिपक देशमुख, शिवा गावंडे, रूस्तम दाभाडे, अमोल दाभाडे, प्रशांत गावंडे, गौरव पाटील, दिलीप देशमुख, संदीप पाटील, अक्षय भालतडक, गजानन दाभाडे, सर्जेराव दाभाडे, गजानन भालतडक, अमोल क्षीरसागर, अनंता सारोकार, गोपाल बावस्कार, विठ्ठल बावस्कर यांच्यासह ४८ जणांना पोलिसांनी सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान ताब्यात घेतले व दुपारी ३ वा. सोडण्यात आले. त्यांच्यावर कलम ६८, ६९ अन्वये कारवाई करण्यात आली. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजित पाटील, राकाँचे जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, यांनी कार्यकर्त्यांना भेट दिली. तर नुकसानग्रस्त एसटी क्रमांक एमएच१४-बीटी ०१०७ मुक्ताईनगर आगार आणि दुसरी क्षतीग्रस्त एसटी बस क्र. एमएच १४-बीटी ४५३० जळगाव जामोद आगारच्या दोन्ही चालकांनी जळगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार सार्वजनिक संपत्तीचे नुकसान म्हणून भादंविचे कलम ३४१, ४२७, १८६, ३३६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय सरदार हे करीत आहे. (प्रतिनिधी)
Maratha Kranti Morcha : जळगावात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 4:38 PM
जळगाव जामोद : सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने जळगावमध्ये आज २४ जुलै रोजी मराठा तरूणांनी रास्ता रोको केला.
ठळक मुद्देदोन एसटी बसच्या काचा फोडल्या तर शहरातील शाळा कॉन्व्हेंट आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली. याबाबत नियोजन करून उद्या जळगावात बंद ठेवण्यात येईल असे मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले. ४८ जणांना पोलिसांनी सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान ताब्यात घेतले व दुपारी ३ वा. सोडण्यात आले.