वरवटबकाल ( ता. संग्रामपूर ) : मराठा समाज क्रांती मोर्चाच्या आरक्षणासह विविध मागणी साठी संग्रामपूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला. सकाळी ८ वाजतापासूनच गावातील सर्व प्रतिष्ठाने बंद करण्यात आले होते.आरक्षण सह विविध मागणी साठी राज्यात आतापर्यंत ५८ मोर्चे काढले. परंतु, सरकारने जाहीर केलेल्या सवलतीतून काहीच पदरी पडले नाही. शासनाने केवळ समाजाची दिशाभूल करून दोन वर्षा पासून लढा देत असताना सरकारने अध्यापही सविधानीक तोडगा काडला नाही म्हणूनच संपूर्ण महाराष्ठात एक मुख मागणी सुरु आहे. वैजनाथ व पंढरपूर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा येत संग्रामपूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण सकल मराठा समाजाच्या वतीने वरवट बकाल येथे रास्ता रोको सह येथिल सर्व लहान मोठे दुकाने बंद करण्यात येऊन तबल एका तासाने आंदोलन थंबण्यात येऊन सर्व रास्ता व दुकाने सुरळीत चालू करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सरकार विरुद्ध नारे बाजी करीत ‘एक मराठा लाख मराठा’ जय घोष करीत आरक्षणाची मागणी करण्यात आली. मराठा समाजाला न्याय द्यावा तसेच काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस जबाबदार अधिकाºयावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. संग्रमापूर तालुक्यातील मराठा समाजाचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, मराठा समाज बांंधव मोठ्या संख्येने वरवट बकाल येथील रास्तारोको आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी काकासाहेब शिंदे यास श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली.