दुसरबीड : जवळच असलेल्या राहेरी बु. येथे सकल मराठा बांधवांनी १ आॅगस्ट रोजी सकाळी गावातून फेरी काढून किनगाव राजा येथे ४ कि़मी पायी जाऊन किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये जेलभरो आंदोलन केले. यावेळी जवळपास ३०० समाजबांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला. मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, आंदोलनात शहीद झालेल्या आंदोलकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, यासाठी किनगाव राजा पोलिस स्टेशन येथे जलभरो आंदोलन करण्यात आले. जवळपास २ तास जेलभरो आंदोलन सुरू होते. यावेळी आंदोलनात सहभागी समाज बांधवांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी एक मराठा लाख, मराठा व एकच मिशन, मराठा आरक्षण अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी काकासाहेब शिदे यांच्यासह इतर सात जणाना पोलीसस्टेशन मध्ये श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन शेवाळे, उपनिरीक्षक किशोर शेरकी आदींनी चोख बंदोस्त ठेवण्यात आला होता.
Maratha reservation : सकल मराठा बांधवांचे जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 4:01 PM
दुसरबीड : जवळच असलेल्या राहेरी बु. येथे सकल मराठा बांधवांनी १ आॅगस्ट रोजी सकाळी गावातून फेरी काढून किनगाव राजा येथे ४ कि़मी पायी जाऊन किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये जेलभरो आंदोलन केले
ठळक मुद्दे किनगाव राजा पोलिस स्टेशन येथे जलभरो आंदोलन करण्यात आले.काकासाहेब शिदे यांच्यासह इतर सात जणाना पोलीसस्टेशन मध्ये श्रध्दांजली वाहण्यात आली.