धानोरा (जि. बुलडाणा), दि. १२: जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी गुरुवारीच रात्री मृतक विवाहितेचा भाऊ सुपडा सुखदेव ढोले रा. वडगांव गड यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या फिर्यादीत नमूद केले आहे की, घर बांधण्याकरीता माहेरहून ५0 हजार रुपये आण असा दीपक भगवान गोंड (पती), भगवान गोंड (सासरा),सौ. कमलाबाई गोंड (सासू) यांच्याकडून लावण्यात येत होता. तसेच याच कारणावरुन मृतक सौ.दुर्गा हिचा मानसिक ,शारीरिक छळ केला. यामुळे सौ.दुर्गा गोंड हिने आत्महत्या केली. , अशा आशयाच्या फिर्यादीवरुन जळगाव जामोद पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुध्द कलम ४९८, ३0४ (ब) भादंवि ३४ नुसार गुन्हा दाखल केली असून उपरोक्त तीनही आरोपींना अटक केली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी साळुंके यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय पाटकर व त्यांचे सहकारी करीत आहे. आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विवाहिता आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: August 13, 2016 1:05 AM