शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

विवाहीतेची चिमुकल्यासह विहीरीत आत्महत्या; वाचविण्यास गेलेल्या तरुणाचाही बुडून मृत्यू

By निलेश जोशी | Published: November 07, 2023 7:08 PM

मायलेकावर एकाच सरणावर अत्यंसस्कार

चिखली (जि. बुलढाणा) : दिवाळसणामुळे सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण असतानाच तालुक्यातील भरोसा या गावासाठी ६ नोव्हेंबरची रात्र काळरात्र बनून आली. एका २६ वर्षीय विवाहितेने अवघ्या २१ महिन्यांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या मायलेकांना वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारलेल्या तरूणाचाही गाळात फसल्याने मृत्यू झाला. या घटनेतील तिघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करतांना ७ नोव्हेंबर रोजी अवघे गावकरी हळहळले.

भरोसा येथील विवाहिता शितल गणेश थुट्टे हिने अवघ्या २१ महिन्यांचा देवांश या चिमुकल्यासह गावातील शेतकरी दिनकर जाधव यांच्या मालकीच्या विहिरीत ६ नोव्हेंबरच्या सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केली. शितल हिने चिमुकल्यासह विहिरीत उडी घेतल्याचे समजताच त्यांच्या वाचविण्यासाठी गावातील सिध्दार्थ निंबाजी शिरसाठ (३६) यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, सिध्दार्थ यांचे पाय गाळात फसल्याने त्यांचाही करूण अंत झाला.

सिद्धार्थ शिरसाट हे पट्टीचे पोहणारे होते. परंतू, संध्याकाळची वेळ असल्याने विहिरीत अंधार होता. शिवाय विहिरीतील गाळ असेल याची त्यांना कल्पना नसल्याने त्यांचाही घात झाला. दरम्यान गावातीलच सुखदेव त्र्यंबक थुट्टे (५५) यांनी विहिरीत उडी घेतली होती. सुदैवाने काठावरील ग्रामस्थांनी तातडीने विहिरीत दोर सोडून त्यांना सुखरूप बाहेर काढले. माहिती मिळताच अंढेरा पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रात्रीचा अंधार व विहिरीत गाळ असल्याने मृतदेह काढणे जिकरीचे ठरले होते. ७ नोव्हेंबरच्या पहाटे हे तीनही मृतदेह बाहेर काढल्यानंतर तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते. दुपारी भरोसा येथेही तीनही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्ध्यावरती डाव मोडलाया दुर्देवी घटनेत मृत महिलेचा पती गणेश थुट्टे हा शेती व शेतमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. तीन वर्षांपूर्वी त्यांचा शितल सोबत विवाह झाला होता. त्यांच्या संसारवेलीवर देवांशच्या रुपाने फुलही उमलेले होते. घटनेच्या दिवशी दुपारी ३ वाजता चिमुकला देवांश घरासमोर खेळत असल्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत करून शितल यांनी पतीला पाठविला होता. मात्र, शितल यांनी हे टोकाचे टाकाचे पाऊल का उचलले? हे स्पष्ट होऊ शकले नाही.

मायलेकावर एकाच सरणावर अत्यंसस्कारदुर्घटनेतील तिघांवर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मृत शितल व निष्पाप चिमुकला देवांश यांच्या पार्थिवावर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWomenमहिलाDeathमृत्यू