बुलडाणा : नागपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय शिकई मार्शल आर्ट १९ वर्षाचे आतील स्पर्धेत बुलडाण्यातील पुनम पवार हिने कास्यपदक प्राप्त केले. क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच जिजामाता महाविद्यालय बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा येथील रनिंग ट्रॅकजवळील टेबल टेनिस हॉलमध्ये स्वयंसिध्दा अंतर्गत चालणाºया मार्शल आर्ट प्रशिक्षण वर्गातील पुनम पवार हिने विभागीय क्रीडा संकुल नागपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय शिकई मार्शल आर्ट १९ वर्षाचे आतील स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले. जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील व एडेड हायस्कूलचे प्राचार्य आर.ओ.पाटील यांनी तिचे कौतूक केले असून सदर स्पर्धेला क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अलका मुखर्जी इत्यादींच्या उपस्थितीत पुनम पवार हिस कांस्यपदक देण्यात आले. पुनम हिने आपल्या यशाचे श्रेय पालक व प्रशिक्षक अरविंद अंबुसकर यांना दिले.
नागपुरातील मार्शल आर्ट स्पर्धेत बुलडाण्याच्या पुनमला कास्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 1:30 PM
बुलडाणा : नागपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय शिकई मार्शल आर्ट १९ वर्षाचे आतील स्पर्धेत बुलडाण्यातील पुनम पवार हिने कांस्यपदक प्राप्त केले.
ठळक मुद्देशालेय राज्यस्तरीय शिकई मार्शल आर्ट १९ वर्षाचे आतील स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले.