लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : भाजपाचे युवा नेते कुणाल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्व. दत्ता पैठणकर स्मृतिप्रीत्यर्थ प्रथमच नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात नीलम ११ संघाने जेतेपद मिळवीत १ लाख ११ हजार १११ रुपयाचे बक्षीस जिंकले. स्पर्धेचे ५५ हजार ५५५ रुपयाचे द्वितीय पारितोषक गोल्डन शायर औरंगाबाद संघाला देण्यात आले.
तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर २७ ते ३१ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या नगराध्यक्ष चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद, अमरावती, जालना, नाशिकसह जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील सर्वच सामने अत्यंत रंगतदार झाले. सर्वच सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लाभली. स्पर्धेचा अंतिम सामना नीलम ११ चिखली विरुद्ध गोल्डन शायर औरगांबाद या दोन संघामध्ये झाला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात नीलम ११ संघाने जेतेपद पटकावले. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रुपये नगराध्यक्षा प्रिया कुणाल बोंद्रे यांच्याकडून नीलम संघाला तर द्वितीय पारितोषिक ५५ हजार ५५५ रुपये स्व. दत्ता पैठणकर मित्र मंडळाकडून सचिन मोरे ११ (गोल्डन शायर) औरंगाबाद या संघांना देण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, विद्याधर महाले, नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, प्रा. नरेंद्र खेडेकर, ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब पळसकर, बाजार समितीचे संचालक काशीनाथआप्पा बोंद्रे, संजय चेके पाटील, कपिल खेडेकर, नगरसेवक गोपाल देव्हडे, दीपक खरात, अथरोद्दीन काजी, रवींद्र तोडकर, सलीम मेमन, प्रा.डॉ. नीलेश गावंडे, सुरेशआप्पा बोंद्रे, गुलजमा, डॉ. सपकाळ, राकेश मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.