सिंदखेडराजा : शहरातील दुकाने सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गुरूवारी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांना निवेदन दिले आहे.
शहरात अत्यावशक सेवेतील दुकाने उघडी आहेत. परंतु, शेकडो लोकांचे व्यवसाय बंद आहेत. दुकाने बंद असलेले व्यवसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे त्यांना सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा द्यावी. येथील सर्व दुकानदार कोविड नियमांचे पालन करतील. दुकानदारांनी लसीकरण आणि टेस्ट करून घेतली. दुकानांमध्ये सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी इतर सर्व नियमांचे पालन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही तायडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.