शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

‘एमसीए’च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 12:41 AM

थेट द्वितीय वर्षासाठी अर्ज स्वीकारण्यास विद्यापीठाने नकार दिल्यामुळे "एमसीए"च्या व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.

फहीम देशमुख। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) व अमरावती विद्यापीठातील समन्वयाच्या अभावाचा फटका मास्टर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (एमसीए) च्या व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांना बसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. थेट द्वितीय वर्षासाठी अर्ज स्वीकारण्यास विद्यापीठाने नकार दिल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. एमसीए हा पदव्युत्तर अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून, या अभ्यासक्रमासाठी बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमसीच्या प्रवेश परीक्षेनंतर यापूर्वी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेता येत होता. मात्र, आता विद्यापीठाने एमसीए अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश न देण्याचे धोरण आखले आहे. एमसीए अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून म्हणजेच तीन वर्षे पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘एमसीए’च्या प्रथम वर्षाचा किमान ७५ हजार रुपये अतिरिक्त खर्च, याशिवाय एक वर्ष अतिरिक्त द्यावे लागणार आहे. विदर्भात एमसीएचे एकूण २५ कॉलेजेस असून, यामध्ये सुमारे १७५० विद्यार्थी शिक्षण घेतात. बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेले विद्यार्थी जे एमसीएच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छितात अशांची संख्या ६५० च्या जवळपास आहे. यासाठी विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश द्यावा, असे साकडे पश्चिम विदर्भातील विद्यार्थी शृंग पाठक, शुभम श्रीनाथ, तृप्ती देशमुख या विद्यार्थ्यांनी घातले आहे.