सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) : ‘समृद्धी’वरील वाढते अपघात लक्षात घेता यंत्रणा कामाला लागली असून, भविष्यात अपघात होऊ नयेत, याअनुषंगाने सरकारकडून उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर दिली. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत घटनास्थळावर येण्यापूर्वीच त्यांनी जाहीर केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेले जास्तीत जास्त अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळे झाले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यांनीही दिली घटनास्थळी भेटसंदीपान भुमरे, अतुल सावे, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्त निधी पांडेय, खा. प्रतापराव जाधव, विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी एच. जी. तुम्मोड, पोलिस अधीक्षक सुनील कडासने, आ. संजय रायमूलकर, आ. श्वेता महाले, आ. शशिकांत खेडेकर, आ. आकाश फुंडकर आदींनी घटनास्थळी भेट दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व यंत्रणा काम करीत आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मृत्युमुखी पडलेल्यांना पाच लाख रुपये देऊन हा प्रश्न सुटणार नाही. महामार्ग नियाेजनाचे ज्ञान असलेल्या तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, ठाकरे गट बेदरकारीने गाड्या चालविणाऱ्या चालकांवर चाप बसवायलाच हवा. - राज ठाकरे, अध्यक्ष, मनसेहा अपघात नसून सरकारी अनास्थेचे बळी आहेत. म्हणून या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँगेस