शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

वैद्यकीय चमूने दिले मायलेकाला जीवदान!

By admin | Published: January 14, 2017 12:35 AM

शर्थीचे प्रयत्न; तिळ्यापैकी दोन बालकं दगावली!

मनोज पाटील मलकापूर, दि. १३- वेळेच्या आधीच २८ वर्षीय गरोदर महिलेल प्रसुती कळा उठल्या त्यातच उदरात तीळे असल्याने प्रसुतीची गुंतागुंत वाढली असता वैद्यकीय चमूच्या प्रयत्नानंतर एका बाळासह मातेचे प्राण वाचविण्यात यश आल्याची घटना मलकापूर तालुक्यातील मौजे वडोदा या गावात ११ जानेवारी रोजी घडली.वडोदा येथील ग्रामस्थ रघुनाथ लोणकर यांच्या पत्नी रूखमा लोणकर या गरोदर महिलेला ३१ आठवड्यांच्या कालावधी पूर्ण झाला. रुखमा यांच्या उदरात तीन बाळ असल्याची बाब तपासणी दरम्यान आरोग्य उपकेंद्राच्या मदतनिस एन.एम. भंडारे यांच्या लक्षात येताच परिस्थिती प्रसुती होण्यासारखी असल्याने त्यांनी लगेच संदर्भ सेवेसाठी १0८ वर फोन लावला व त्यानंतर उमाळी आरोग्य केंद्राचे डॉ. खाडे यांना परिस्थितीबाबत अवगत केले. या धडपडीतच सकाळी ६.२0 वाजता एका बाळाची प्रसुती करण्यात आली. दरम्यान रूग्णवाहीका व डॉ. खाडेसुध्दा हजर झाले. ७.३0 वा. मातेने दुसर्‍या बाळाला जन्म दिला. परंतु या बाळाने एकही श्‍वास घेतला नाही. अशावेळी वैद्यकीय चमुने बाळाला श्‍वास घेण्यास उत्तेजित केले. माऊथ टू माऊथ श्‍वास दिला ओटू ऑक्सीजन लावले. या धडपडीतच ७.४५ वा. तिसरे बाळ प्रसुत करण्यात आले. या तिनही बाळांना उब मिळावी म्हणून गरम कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आले.त्यानंतर मातेसह नवजात शिशूला ८.२0 वाजता मलकापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान बालरोग तज्ज्ञांनी माता व बाळांना तपासले असता दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाचे बाळाला मृत घोषित केले. तर क्रमांक एकच्या बाळाला संदर्भसेवेसाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात रेफर करण्यात आले. आज रोजी त्या बाळाची व मातेची तब्येत व्यवस्थित ते सुखरूप आहे.