जालना येथे होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी देऊळगाव राजा येथून सकाळी ९ वाजता पोस्ट ऑफिसजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून एकत्रितपणे सिंदखेड राजाला समाजबांधव प्रस्थान करणार आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ यांना १० वाजता अभिवादन करून मोर्चा एकत्रितपणे जालनाकडे जाणार आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील २०० दुचाकी आणि त्यामागे १०० चारचाकी वाहनांचा ताफा एकत्रितपणे बुलडाणा जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधवांचे प्रतिनिधित्व करणार आहे. मोर्चात जाण्यासाठी देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, जालना या मार्गातील खेड्यातील ओबीसी युवक दोनचाकी वाहनांद्वारे या ताफ्यासमोर सहभागी होतील. या बैठकीत विदर्भ वंजारी सेवा परिषद अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ, समता परिषद जिल्हा अध्यक्ष संतोष खांडेभराड, गोर सेना जिल्हाध्यक्ष डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषद सदस्य विनोद जी. वाघ, रामप्रसाद गुरव, नगरसेवक अशोक पांगारकर, नगरसेवक शशी घुगे, ओमप्रकाश चितळकर, संतोष जमदढे, डॉ. शिवाजी मुंडे, ॲड. मधुकर सोनुने, दीपक बोराडे, रमेश कायंदे, नामदेव राठोड, आकाश म्हेत्रे, संजय ठाकरे, मधुकर जायभाये, डॉ. गणेश मांटे, नगरसेवक सुधाकर जायभाये, अमोल काकड, जनाबापू मेहेत्रे, बाबुराव नागरे, प्रदीप वाघ, वामनराव आघाव, श्रीकृष्ण मेहत्रे, बालाजी सोनुने, दत्ताजी खरात, मौर्य मेहेत्रे, संजय जी. ठाकरे, गणेश तिडके, लक्ष्मण मेहेत्रे, अशोक नागरे, राजू राठोड, ॲड. डोईफोडे भालचंद्र, भगवान नागरे, सुधाकर रायमुलकर, शिवकुमार बुजाडे, पुरुषोत्तम बुजाडे, स्वप्निल सोनुने, संतोष मालोदे, नंदकिशोर खरात, एकनाथ सोनुने, गजानन कायंदे आदी उपस्थित होते. बैठक यशस्वी करण्यासाठी विलास जायभाये, प्रा. ज्ञानेश्वर नागरे, जगतजी घुगे, नीलेश वनवे, भाजपा युवा तालुकाध्यक्ष शिवाजी काकड, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक घुगे, मनसेचे राजू मांटे, कृष्णा वाघ, सुरेश वनवे, किरण जायभाये, अमोल काकड, शरद नागरे, अमोल कायंदे यांनी परिश्रम घेतले.
ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:34 AM