साखरखेर्डा येथील गजानन महाराज मंदिर परिसरात वारकरी महामंडळाची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष दामूअण्णा शिंगणे होते, तर जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र तळेकर, तालुका अध्यक्ष पंजाबराव बिल्लारी महाराज उपस्थित होते. कोरोना काळात सर्व मंदिरे बंद असल्याने भाविकांना श्रध्देचे ठिकाण दुर्लभ झाले आहे. एकादशीला मंदिर बंद असल्याने भाविकांच्या श्रेध्देला ठेच पोहोचत आहे. काही ठिकाणी सोशल डिस्टनचे अंतर ठेवून दर्शनाचा लाभ मिळत आहे. परंतु ग्रामीण भागातील मंदिरे आजही बंदच आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव हा आषाढी एकादशीचा असतो. कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी शासनाने आजही निर्बंध कायम ठेवले आहेत. शासनाचा निर्णय योग्यच आहे, परंतु फिजिकल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवून आषाढी एकादशी उत्सव साजरा होत असेल, तर शासनाने परवानगी द्यावी, असा ठराव २९ जूनच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी किरण महाराज शिंदे, उद्धव जवंजाळ, सुखदेव महाराज ठोकरे, गजानन महाराज ठेंग, काकडे महाराज, अशोक पाटील, डी. एन. पंचाळ, दिलीप खरात, भानुदास जायभाये, माधव जाधव, शरद मानतकर, शुभम तांगडे उपस्थित होते.
वारकरी महामंडळाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:22 AM