लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा (बुलढाणा): बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मोताळा तालुका शालेय पोषण आहार योजना कर्मचारी, स्वयंपाकी तथा मदतनिस यांची बैठक मोताळा पंचायत समिती सभागृहात शनिवारी पार पडली. दरम्यान संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष लिकायत खान, उपाध्यक्ष महादेवराव पाटील व तालुका अध्यक्षा संगीता राठोड यांनी शापोआ (शालेय पोषण आहार ) योजना कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत आ.हर्षवर्धन सपकाळ यांना माहिती देवून लेखी निवेदन सादर केले. २००३ पासून कार्यरत स्वयंपाकी आणि मदतनीस यांना कायम करण्यात यावे, मानधनात सन्मानजनक वाढ करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचा यात समावेश आहे. आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी शापोआ योजनेविषयी मार्गदर्शन करुन स्वयंपाकी तथा मदतनिस संघटनेने शासनाकडे केलेल्या मागण्यांबाबत पाठपुरावा करणेबाबत बैठकीत आश्वासन दिले. तत्पुर्वी, मोताळा पं.स.सभापती उखाजी चव्हाण, जि.प.सदस्य अनिल पाटील खाकरे, जि.प.सदस्य गवई, राजपूत यांची समायोचित भाषणे झाली. आयोजित बैठकीला तालुक्यातील कर्मचारी वसंत आडे, जुलालसिंग बोराडे, संजय आमले, सदाशिव उबाळे, सत्यवान टेकाडे, संतोष कोळसे, नामदेव खर्चे, उर्मिला जाधव, चिंधाबाई खराटे, अश्विनी तळोले, मालुबाई देशमुख, रुपाली राठी, शोभा जोशी, पंचफुला किरोचे, कांताबाई राठोड, उषा मिरगे, रत्नकला तायडे, रेणुका बोराडे, गिता चहाकर, अनिता कोळसे, संगिता चहाकर, माया जाधव तसेच नांदूरा तालुकाध्यक्ष व मलकापूर तालुका अध्यक्ष यांची आवर्जून उपस्थिती होती.
मोताळा येथे पार पडली शालेय पोषण आहार योजना कर्मचा-यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 7:16 PM
मोताळा (बुलढाणा): बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मोताळा तालुका शालेय पोषण आहार योजना कर्मचारी, स्वयंपाकी तथा मदतनिस यांची बैठक मोताळा पंचायत समिती सभागृहात शनिवारी पार पडली.
ठळक मुद्देआमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक