लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : विविध विभागातील अनेक कर्मचार्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शासन सेवेत घातले; मात्र सेवानवृत्त झाल्यानंतर शासनाचे या सेवानवृत्त कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सेवानवृत्त कर्मचार्यांच्या विविध मागण्या पूर्ण करून ३१ मार्च २0१८ पर्यंत पेन्शन वाढ करावी, अन्यथा ईपीएस ९५ सेवानवृत्त कर्मचार्यांच्यावतीने संपूर्ण देशात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ईपीएस ९५ च्या कर्मचार्यांनी दिला आहे. स्थानिक चनखोरे कॉलनीमध्ये शिवमंदिरावर ४ फेब्रुवारी रोजी ईपीएस ९५ सेवानवृत्त कर्मचार्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कर्मचार्यांनी सरकारविरुद्ध एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे. ईपीएस ९५ चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानवृत्त कर्मचार्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी विविध आंदोलन करण्यात आले आहे. संसदेचे सर्व खासदार, देशाचे पंतप्रधान आदींना यासंदर्भात लोकशाही मार्गाने निवेदने दिली आहेत; मात्र सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. याबाबत सेवानवृत्त कर्मचार्यांनी मेळाव्यामध्ये सरकारविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या ३१ मार्चपर्यंत सेवानवृत्त कर्मचार्यांची पेन्शन वाढ न केल्यास संपूर्ण देशामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सेवानवृत्त कर्मचार्यांनी दिला आहे. यावेळी शिवाजी सानप, हिंमतराव देशमुख, बी.बी. चौधरी, आसाराम फंगाळ, गरकळ, बी.बी. गवई, अशोक देशमुख, ए.सी. पठाण यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. या मेळाव्याला डी.बी. इंगळे, आर.पी. चांदणे, व्ही.आर. चांदणे, व्यवहारे, केळे, चौधरी, देवराव वाघ, पी.के. चवरे, मोरे, कंकाळ आदी उपस्थित होते.
मेहकर : ३१ मार्चपर्यंत नवृत्ती वेतनात वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:47 PM
मेहकर : विविध विभागातील अनेक कर्मचार्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शासन सेवेत घातले; मात्र सेवानवृत्त झाल्यानंतर शासनाचे या सेवानवृत्त कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सेवानवृत्त कर्मचार्यांच्या विविध मागण्या पूर्ण करून ३१ मार्च २0१८ पर्यंत पेन्शन वाढ करावी, अन्यथा ईपीएस ९५ सेवानवृत्त कर्मचार्यांच्यावतीने संपूर्ण देशात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ईपीएस ९५ च्या कर्मचार्यांनी दिला आहे.
ठळक मुद्दे शासनाचे या सेवानवृत्त कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे - आरोप