बुलडाणा न्यूज नेटवर्कडोणगाव : पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील एका १७ वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ३० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.बेलगाव येथील दयाराम फकीरा इंगळे यांचा एकुलता एक मुलगा शुभम दयाराम इंगळे (१७) हा ३० मार्चला दुपारी काही मुलांसोबतच पोहण्यासाठी महादेव ओलांडा शेतशिवारात गेला होता. विहिरीत त्याने उडी मारली; मात्र तो विहिरीतील पाण्यातून बाहेर आला नाही. त्याला पोहणे येत होते; मात्र तो विहिरीतील पाण्यातून बाहेर न आल्याने तेथे उपस्थित असलेल्या मुलांनी आरडाओरड केली. तेव्हा शेजारील शेतातील लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. सोबतच विहिरीत शुभमचा शोध घेतला; मात्र तोवर शुभमची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी मृत शुभमच्या वडिलांनी डोणगाव पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मेहकर : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:26 IST
डोणगाव : पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील एका १७ वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ३० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मेहकर : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू!
ठळक मुद्देमेहकर तालुक्यातील बेलगाव येथील घटना