लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: मेहकर विधानसभा मतदारसंघावरील शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व कायम असून, ८९ ग्रा.पं. पैकी ७७ ग्रा.पं.वर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ७ ऑक्टोबरला झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीची मतमोजणी ९ ऑक्टोबरला झाली. मेहकर तालुक्यातील एकूण ५0 ग्रा.पं.च्या निवडणुका होणार होत्या. पैकी बाभुळखेड, वागदेव व वडगाव माळी ग्रा.पं. निवडणुकीपूर्वीच अविरोध होऊन तिथे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. तर द्र्रुगबोरी व वरदडा, मोहदरी या २ ग्रा. पं.च्या सरपंच पदाचे उमेदवारही अविरोध निवडून आले. उर्वरित ४५ ग्रा.पं.च्या सरपंच व सदस्य पदासाठी निवडणूक होऊन आज निकाल जाहीर झाले. ५0 पैकी ४५ ग्रा.पं.वर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर लोणार तालुक्यात ३९ पैकी ३२ ग्रा.पं.वर भगवा फडकल्याने एकूण ८९ पैकी ७७ ग्रा.पं.वर शिवसेनेचा भगवा फडकल्याची माहिती खासदार तथा संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी दिली आहे. शिवसेनेच्या विजयी सरपंच, सदस्यांनी आज निकाल जाहीर हो ताच शिवसेना कार्यालयात येऊन खासदार प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर यांची भेट घेतली. यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, प्रा. बळीराम मापारीसह पदाधिकारी हजर होते. तसेच स्वातंत्र्य मैदानावर सर्व विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष साजरा केला.
प्रतापराव जाधव यांच्याकडून स्वागतमेहकर तालुक्यातील ८९ ग्रा.पं. पैकी ७७ ग्रा.पं.वर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. विजयी उमेदवारांचे खा.प्रतापराव जाधव यांच्याकडून स्वागत करण्यात आले. शिवसेना कार्यालयावर ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये शिवसेनेचे सर्व विजयी उमेदवार हजर झाले होते. यावेळी शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी स्वा तंत्र्य मैदानावर तसेच शिवसेना कार्यालयासमोर विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.