लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सं पूर्ण देशात स्वच्छ भारत मिशन मोहीम राबविण्यात येत आहे. त्या पृष्ठभूमीवर मेहकर शहर भाजपाच्यावतीने १७ सप्टेंबर पासून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात करण्यात आली. दररोज ठिकठिकाणी स्वच्छता करण्याचा संकल्प यावेळी भाजप पदाधिकार्यांनी केला आहे.आपले घर, अंगण, परिसर, गाव स्वच्छ राहून नागरिकांचे आरोग्य चांगले व निरोगी राहावे या उद्देशाने व स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यासाठी मेहकर शहर भाजपाच्यावतीने शहराध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर यांच्या नेतृत्वात स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व भाजप पदाधिकार्यांनी शिवाजी उद्यान परिसर, अण्णाभाऊ साठे परिसर, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका हा सर्व परिसर स्वच्छ केला. तर दररोज ठिकठिकाणी स्वच्छता करून १७ सप्टेंबरपासून ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत हा स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यावेळी शहर अध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर, ज्येष्ठ ने ते लक्ष्मीकांत मोहरील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड. शैलेश देशमुख, विस्तारक राजेंद्र टाकळकर, अशोक अडेलकर, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना पांडे, जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी कंकाळ, जिल्हा सचिव पद्मजा पारवे, कमल गायकवाड, पार्वती कान्हे, चित्रलेखा पुरी, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप इलग, भाजयुमो जिल्हा संघटक किरण जोशी, माजी शहर अध्यक्ष दिलीप शर्मा, विजय सपकाळ, राजेश निकम, अजिम जहागिरदार, एल.के. मानवतकर, डॉ.डी.एफ.माल, संदीप गवई, अय्याज कुरेशी, रोहित सोळंके, रहीसभाई शेख मशीद, देवा अवसरमोलसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.
मेहकर येथे स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:47 AM
भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सं पूर्ण देशात स्वच्छ भारत मिशन मोहीम राबविण्यात येत आहे. त्या पृष्ठभूमीवर मेहकर शहर भाजपाच्यावतीने १७ सप्टेंबर पासून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात करण्यात आली. दररोज ठिकठिकाणी स्वच्छता करण्याचा संकल्प यावेळी भाजप पदाधिकार्यांनी केला आहे.
ठळक मुद्देभाजपाचे आयोजन विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प