शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

मेहकर तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीत नेत्यांचा भरणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:29 AM

सध्या भाजपाचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सर्वत्र आहे; मात्र भाजप व राष्ट्रवादीची मेहकर तालुक्यातील परिस्थिती पाहता या दोन्ही पक्षात मेहकर तालुक्यात नेत्यांचाच भरणा जास्त प्रमाणात दिसत असून, कार्यकर्ते मात्र वार्‍यावर आहेत.

ठळक मुद्देकार्यकर्ते वार्‍यावर वरिष्ठांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप!मागोवा राजकारणाचा 

उद्धव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: सध्या भाजपाचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सर्वत्र आहे; मात्र भाजप व राष्ट्रवादीची मेहकर तालुक्यातील परिस्थिती पाहता या दोन्ही पक्षात मेहकर तालुक्यात नेत्यांचाच भरणा जास्त प्रमाणात दिसत असून, कार्यकर्ते मात्र वार्‍यावर आहेत. हा सर्व प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, केवळ पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे मेहकर तालुक्याकडे सतत जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने पक्ष वाढण्याऐवजी अधोगतीला जात असल्याचा आरोप दोन्ही पक्षातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी केला आहे. वरिष्ठांच्या अशा वागण्यामुळे भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रत्येक निवडणुकीत पराभावाचा सामना करावा लागत आहे.गेल्या कित्येक वर्षानंतर मतदारांनी परिवर्तन घडवून महाराष्ट्र व देशात भाजपाच्या हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी मतदारांच्या परिवर्तनाला आशीर्वाद समजून, मतदारांनी दिलेल्या कौलचा सन्मान करत, शेतकरी व जनहितासाठी भविष्याच्या दृष्टीने चांगले निर्णय घेत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी भाजपची ताकद वाढत आहे; परंतु मेहकर तालुका याला अपवाद ठरत आहे. मेहकर तालुक्यात भाजपची स्थिती दयनीय होत चालली आहे. भाजपने शेतकरी व सर्वसामान्यांसाठी शहरात व तालुक्यात कोणतेही जनहिताचे कार्यक्रम राबविले नाहीत  किंवा जनतेच्या मागण्यांसाठी आंदोलने (शिवसेना सत्तेत असूनही जनतेसाठी आंदोलने करते) केली नाहीत. भाजप सरकारच्या विकासाचा अजेंडा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात भाजपचे पदाधिकारी असर्मथ ठरत आहेत. फक्त विश्रामगृह अथवा एका खोलीत केवळ काही तुरळक पदाधिकारी (कार्यकर्ते नव्हे) थातूर-मातूर बैठक घेतात व स्वत:च्या पदासाठी झगडत असतात, असे अनेक प्रकार मेहकरवासीयांनी गेल्या दोन वर्षाच्या काळात अनुभवले आहेत. एखाद्या वरिष्ठ मंत्र्याचा व पदाधिकार्‍याचा वाढदिवस आला की रुग्णांना फळवाटप किंवा झाडे लावण्याचा कार्यक्रम घेऊन मोकळे व्हायचे. मेहकर तालुक्यात भाजपमध्ये अनुभवी, राजकीय जाण असलेला, खंबीर, रोखठोक नेत्याचा अभाव आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या महत्त्वाच्या ठिकाणी भाजपाचा एक सदस्य निवडून आलेला नाही; मात्र भाजप महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी कंकाळ यांनी मात्र लहान-मोठे कार्यक्रम घेऊन भाजप जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु मेहकरच्या भाजपमध्ये असलेले गट पाहता मंदाकिनी कंकाळ हय़ सुद्धा अनेक वेळा अडचणीत येतात. कारण अनेक पदाधिकारी हे केवळ मान-सन्मानासाठी काम करीत आहेत. त्या पदाधिकार्‍यांना जनतेचे व भाजप पक्षाचे काही देणे-घेणे नाही. केवळ माझे नाव झाले पाहिजे यासाठी धडपडत आहेत. हा सर्व प्रकार फक्त वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे मेहकरकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच घडत आहे. शहरात व ग्रामीण भागात भाजपाचा मतदार वर्ग आहे; परंतु खंबीर नेतृत्व नसल्याने हा मतदार वर्ग संभ्रमात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात कित्येक वर्ष सत्ता भोगली आहे. १0 ते १२ वर्षांच्या अगोदर मेहकर तालुक्यात राष्ट्रवादीची परिस्थिती समाधानकारक होती. शहरात व ग्रामीण भागात शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे; परंतु भाजप प्रमाणेच राष्ट्रवादीचीसुद्धा परिस्थिती तशीच आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे मेहकरकडे अपेक्षेप्रमाणे दुर्लक्ष होत असल्याने या पक्षातसुद्धा नेत्यांचाच भरणा अधिक आहे. राष्ट्रवादीकडून शेतकरी व जनहिताचे प्रश्न घेऊन थोड्याफार प्रमाणात आंदोलने होतात; मात्र काही दिवसाने त्या आंदोलनाचा कोणताच परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे ही आंदोलने जनतेसाठी होतात, का नेत्यांसाठी होतात हेच मेहकरवासीयांना कळेनासे झाले आहे. तालुकाअध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांच्यामुळे राष्ट्रवादी मेहकर तालुक्यात जिवंत आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी यांचा एकही सदस्य नाही. राष्ट्रवादीच्या बैठकासुद्धा ठरावीक ठिकाणीच होतात. बैठकीत जनतेसाठी काय विषय झाले, विकासाच्या मुद्यावर सत्ताधार्‍यांना कसे धारेवर धरायचे, विरोध कोणत्या मार्गाने करायचा, हे सगळे फक्त बैठकीत बसलेल्या नेत्यांनाच माहिती असते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांना काहीच समजत नाही. दरम्यान, भाजप व राष्ट्रवादीची मेहकर तालुक्यातील परिस्थिती पाहता केवळ वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने दोन्ही पक्षाला वरिष्ठ पातळीवर आत्मचिंतनाची गरज असून, फेरबदल करण्याचीसुद्धा आवश्यकता आहे. तूर्त एवढेच!