लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, कडक ऊन तापायला सुरुवात झाली आहे. परिणामी, मेहकर तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यातील २३ गावांत विहीर अधिग्रहणचे तर तीन गावांमध्ये टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीला आले आहे.दरवर्षी मेहकर तालुक्यात जवळपास ६० ते ६५ गावांत पाणी टंचाई निर्माण होत असते. या पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून पाणी टंचाईचा संभाव्य कृती आराखडा तयार करण्यात येतो. दरम्यान, जानेवारी महिन्यापासूनच अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत होती, तर मार्च महिन्यामध्ये आतापर्यंत सुकळी, लोणी काळे, बारडा, निंबा, उकळी, पारडी, सुळा, परतापूर, गणपूर, जौताळा, नागझरी बु., मोळा, दादुलगव्हाण, बरटाळा, विश्वी, शहापूर, नायगाव देशमुख, शिवपुरी, चिंचोली बोरे, वरवंड, पार्डी, पांगरखेड, लावणा इत्यादी गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून, या गावातील विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव व दृग्रबोरी, वरवंड, पारडी या गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीला प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. यामध्ये काही प्रस्ताव महसूल विभाग मेहकर तर काही प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांतील महिला पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ज्या गावात पाणी टंचाई जाणवत असेल, त्या गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जे प्रस्ताव संबंधित विभागाकडे आले असतील, ते प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
मेहकर तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी पायपीट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:36 AM
मेहकर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, कडक ऊन तापायला सुरुवात झाली आहे. परिणामी, मेहकर तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यातील २३ गावांत विहीर अधिग्रहणचे तर तीन गावांमध्ये टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीला आले आहे.
ठळक मुद्दे२३ गावांत विहिरींचे अधिग्रहण तीन गावांत टँकरचे प्रस्ताव