सिंदखेडराजा (बुलडाणा) : सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्यातून ९ मार्च रोजी स्मृतिज्योत वारीला प्रारंभ झाला. ही वारी सावित्रीबाईंचे माहेर नायगावकडे निघाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिज्योत सोहळ्याचे आयोजन सोमवारला सकाळी ९ वाजता स्थानिक जिजाऊ मासाहेबांच्या राजवाड्यात करण्यात आले होते. नगराध्यक्ष नंदाताई मेहेत्रे यांच्याहस्ते जिजाऊंना अभिवादन व दीप प्रज्वलन करून स्मृतिज्योत सोहळ्याच्या वारीला सुरूवात करण्यात आली. यावेळी देऊळगाव राजाचे माजी नगराध्यक्ष निर्मलाताई खांडेभराड, मंदाताई ठाकरे, सीमा शेवाळे, सरस्वती मेहेत्रे, डॉ. सविता बुरकुल, छबा जाधव, छगनराव मेहेत्रे, विष्णू मेहेत्रे, अँड. नाझेर काझी, देवीदास ठाकरे, सै. नईम, प्रकाश मेहेत्रे, संतोष खांडेभराड, सतीश तायडे, शिवाजीराजे जाधव आदी उपस्थित होते. जिजाऊंच्या माहेरातून निघालेली स्मृतिज्योत सोहळ्याची वारी देऊळगावराजा मार्गे सावित्रीबाई फुले यांचे माहेर असलेल्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे पोहोचणार आहे. स्मृ ितज्योत वारीचा समारोप १0 मार्च रोजी सकाळी १0 वाजता नायगाव येथे होणार आहे. स्मृतिज्योत वारीच्या सुरुवात प्रसंगी शहर परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
सिंदखेडराजातून निघाली स्मृतिज्योत वारी
By admin | Published: March 10, 2015 2:00 AM