नोकरी गेली, आता काय करू?
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने गेल्या १४ महिन्यांपासून अक्षरश: थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासन, प्रशासनास नाइलाजास्तव जमावबंदी, लॉकडाऊन लावावा लागत आहे़ यामुळे कारखाने, कंपन्या, बाजारपेठेतील दुकाने बंद राहून व्यवसाय ठप्प झालेला आहे. परिणामी, अनेकांच्या छोट्या-मोठ्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातील अनेक कुटुंबांतील कर्ते पुरुष आहेत. नोकरी गेल्याने आता काय करावे, ही चिंता त्यांता सतावत आहे.
पुरुष सर्वाधिक तणावात
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकोपामुळे महिलांच्या तुलनेत पुरुषच सर्वाधिक तणावात आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांवर नोकऱ्या जाण्याचे गंडांतर आहे. यासह कोरोनाच्या काळातही नोकरीनिमित्त पुरुषांना बाहेर राहावे लागते. घरी परत गेल्यानंतर आपल्यापासून दुसऱ्याला तर हाेणार नाही ना, या भीतीने पुरुषांना ग्रासले आहे़
कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?
कुटुंबातील प्रत्येकाच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळताना कर्त्या पुरुषांवर कोणतेही संकट आले, तरी ते सहजासहजी व्यक्त होत नाहीत? किंवा चेहऱ्यावरची चिंता घरच्यांना दाखवत नाही, असे मानले जाते. मात्र, कोरोनाच्या संकटाने सर्व मर्यादा उघड केल्या आहेत. रोजगार ठप्प होण्यासह अनेकांना नोकऱ्या हातून निसटल्याने सातत्याने घरातच बसून राहावे लागत आहे. कुटुंबही याबाबत अवगत व्हावे, म्हणून पुरुषही आता मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला लागले आहेत.
तरुणांचे प्रश्न वेगळेच
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या १४ महिन्यांपासून शिक्षणक्षेत्र पूर्णत: कोलमडले आहे. ऑनलाइन शिक्षणाची मात्रा प्रभावी ठरली नाही. अशातच २०२१ मधील शैक्षणिक वर्षही संपुष्टात आले,
विशेषत: दहावी, बारावीचे शिक्षण घेत असलेल्या या तरुणांच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे. काही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचे दुष्परिणाम हाेत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात असताना आयुष्यातील (एकेक वर्षदेखील कमी होत आहे. त्यामुळे कमी वयात अधिक शिक्षणासाठी धडपडणारे तरुण चिंतातुर झाले आहेत. यापुढेही शिक्षणाची स्थिती अशीच राहिली तर भविष्यात नोकरीचा प्रश्न गंभीर होणार, या विवंचनेत काही तरुण सापडले आहेत.
काेट
काेराेनामुळे मानसिक तणाव वाढला आहे. अनेकांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे़ राेजगार गेल्याने अनेक जण नैराश्येत गेले आहेत़ हे टाळण्यासाठी नकारात्मक गाेष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे़ दूरचित्रवाणीवरील मनाेरंजक कार्यक्रम पाहणे, नियमित व्यायाम करणे, एकमेकांना आधार देणे तसेच सकारात्मक विचार करण्याची गरज आहे़
डाॅ़ महेश बाहेकर, मानसाेपचारतज्ज्ञ