खामगाव (बुलडाणा): गत आठवड्यापासून थंडीचा पारा कमालीचा घसरत चालला आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापलेल्या मे हिटनंतर नागरिकांना डिसेंबरअखेर थंडीने गारठले आहे. खामगावात २९ डिसेंबर रोजी ९.८ सेल्सिअस एवढय़ा तापमानाची नोंद करण्यात आली आहे.यावर्षी उन्हाळा कमालीचा तापल्याचे खामगावकरांनी अनुभवले आहे. मे हिटचा तर सर्वांनाच त्रास सहन करावा लागला. यावर्षीच्या उन्हाळ्यात खामगावात ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कडक उन्हाळा तापल्याने पावसाळा चांगला होईल हा अंदाज मात्र सफसेल फोल ठरला. यावर्षीचा पावसाळा हा अत्यल्प होऊन गेला पाच वर्षातील नीचांक ठरला आहे. पाऊस कमी झाल्याने थंडीही फारसी जाणवणार नाही, असा जाणकारांचा अंदाज होता; मात्र नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे काही भागात गारपीट व पाऊस पडल्याने वातावरणात थंडीचा गारवा निर्माण झाला. गत आठवड्यापासून थंडीचा पारा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. थंडीचा कहर वाढतच असल्याने बचावासाठी नागरिकांची खबरदारी घेतली आहे.
पारा ९.८ सेल्सिअस
By admin | Published: December 31, 2014 12:23 AM