अंढेरा : स्थानिक औंंढेश्वर विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गतवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
गतवर्षी भारत अनिल राठोड या विद्यार्थ्याने ९१़.८१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्याला ममताबाई नागरे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या प्रदीप रतन चव्हाण यास साहेबराव सखाराम वनवे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मुलींमधून प्रथम आलेली सागर समाधान सानप (८७़.८० टक्के) हिने मुलींमधून प्रथम येण्याचा मान मिळविला. या विद्यार्थिनीला विठ्ठल मानसिंग दधरे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यालयातून भाग्यश्री रमेश नागरे या विद्यार्थिनीने ८७़ ४० टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला़. तिला साहेबराव सखाराम वनवे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच बारावीमध्ये प्रथम आलेला विशाल अर्जुन जोहरे यास साहेबराव सखाराम वनवे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बारावीमध्ये मुलींमधून प्रथम आलेली पूजा शिवाजी महामुने हिला पांडुरंग पाटील आंधळे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अरुण सानप होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक दिलीप सानप, पडघान, संजय सरोदे, पुंजाराम नागरे, सुशील इंगळे, राजेश पाटील होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गीते, डोईफोडे, कुटे, तेजनकर, हूसे, गवई , घुगेसर, मनोज सानप, अखिलेश डोईफोडे, सोनकांबळे , विलास नांगरे, अर्जुन आंधळे, कारभारी सानप आदींनी परिश्रम घेतले.
120721\2157img-20210712-wa0104.jpg
अंढेरा फोटो