शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

बाप्पांना आज निरोप

By admin | Published: September 08, 2014 1:51 AM

बुलडाणा शहरात आज गणेश विर्सजन; बुलडाणा शहरासह जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त

बुलडाणा : संपूर्ण जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून भक्तांच्या सानिध्यात असलेल्या श्री गणेशाला आज भाविक-भक्त निरोप देणार आहेत. यासाठी विविध गणेश मंडळांच्या कार्यक र्त्यांसह प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. यावर्षी जिल्ह्यात एकूण ८८१ गणेश मंडळांकडून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. याशिवाय २९२ गावात ह्यएक गाव एक गणपतीह्णची स्थापना करण्यात आली. तर पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. गणेशोत्सवानिमित्त ढोल-ताशांची जागा डीजेने घेतल्याचे दिसून येत होती. यावर्षीही अनेक गणेश भक्तांनी ङ्म्री गणेशाला निरोप देण्यासाठी डीजे बुक केले होते; मात्र पोलिसांनी डीजेला बंदी केली आहे. बुलडाण्यात तगडा बंदोबस्तबुलडाणा शहरात यावर्षी शिस्तबद्ध पद्धतीने गणेशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी गणेश मंडळाची बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात आला आहे. सदर मिरवणूक आपल्या परिसरातून संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, जनता चौक, कारंजा चौक, एसबीआय चौक मार्गे निघणार आहे. या मिरवणुकीत प्रथम मानाचा सुवर्ण गणेश मंडळाचा गणपती राहणार आहे. त्यानंतर मिरवणुकीत शहर परिसरात गणेश मंडळ शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार आहेत. शांततेची परंपंरा कायम राखावी; पोलिसांचे आवाहनखामगाव : खामगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी शहरात पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांच्यासह केंद्रीय व राज्य राखीव दलाचा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळी ८ वाजता मानाच्या लाकडी गणपतीची मंदिरात आरती झाल्यानंतर या मिरवणुकीला फरशी येथून प्रारंभ होणार आहे. या वर्षीही गणेश विसर्जन ८ सप्टेंबर रोजी निर्मल टर्निंग ते राणा गेट व शिवाजी वेस ते बोरीपुरा या भागात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खामगाव शहर पोलिसांनी १५७ जणांना विविध कलमांनुसार नोटीस बजाविल्या आहे. तर गत काही वर्षांपासून शांततेत व उत्साहात होणारी गणेश विसर्जन मिरवणूक यावर्षीही शांततेत व उत्साहात पार पाडावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी विसर्जन मार्गावर पोलिसांनी बॅरिकेटिंग केली आहे. तर बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर खामगावात तळ ठोकून असून, त्यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी जी. श्रीधर, शहर पो.स्टे.चे ठाणेदार दिलीप पाटील व शिवाजी नगरचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहा. पोलिस निरीक्षक, केंद्रीय राखीव पोलिस दल, राज्य राखीव दलाची एक तुकडी, दंगाकाबू प थक तसेच शिवाजी नगर व शहर पो.स्टे.सह जिल्हय़ातील इतर पोलिस स्टेशनचे अधिकारी बंदोबस्त ठेवणार आहेत.