लोणार(जि. बुलडाणा) : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन स्तरावरून दोन वर्षांपूर्वी मनरेगा अंतर्गत ५६५ विहिरी मंजूर झाल्या. या विहिरी वाटप करताना पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकार्यांनी कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता शेवटच्या पाच दिवसांत ५६५ विहिरींना मंजुरी देऊन कार्यारंभ आदेशही दिला. परंतु विद्यमान गटविकास अधिकार्यांनी विहीर वाटपात झालेल्या अनियमिततेमुळे मंजुरी दिलेल्या त्या ५६५ विहिरींच्या कामाचे मस्टर न काढल्याने विहिरी खोदण्यासाठी स्वत: जवळून खर्च करून बसलेले शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान यासंदर्भात शेतकर्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राजेश मापारी यांनी दिला आहे.
मनरेगाअंतर्गत विहीरी वाटपात गोंधळ !
By admin | Published: April 15, 2016 2:16 AM