-अनिल गवई।लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील टिचर कॉलनीत सुरू असलेल्या एका इंग्रजी शाळेचे शिक्षण विभागाच्या परवानगी विना स्थंलातर करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांच्या तक्रारीवरून शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, खामगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांकडून शाळेच्या चौकशीकडे हेतू पुरस्परपणे दुर्लक्ष केल्या जात असल्याची चर्चा आहे.खामगाव शहरातील टिचर कॉलनीत १ सप्टेंबर २०१९ पासून मांऊट सिनाई ही इंग्रजी माध्यमाची शाळा अनधिकृतपणे चालविण्यात येत असल्याची तक्रार शहर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी तक्रारकर्ते मो. इमरान मो. इकबाल रा. टिचर कॉलनी, मोहमद इरफान मो. इकबाल यांच्यासह नगर सेवक शेख याकुब शेख महेबुब रा. इकबाल चौक, सराफा लाईन वार्ड नं.१ बुलडाणा आणि शेख ताहेर शेख याकुब रा. बुलडाणा यांचे बयाण नोंदविले. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष शेख याकुब आणि संस्थेचे सदस्य शेख ताहेर शेख याकुब यांनी खामगाव येथे मांऊट सिनाई ही इंग्रजी माध्यमाची शाळा गत चार वर्षांपासून सुरू आहे. या शाळेला शाळेची मान्यताही आहे. मात्र, नशीब कॉलनीतील शाळा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने ही शाळा तात्पुरत्या स्वरूपात टिचर कॉलनीत हलविण्यात आली. यासाठी भाडेतत्वावर एक इमारत भाड्याने घेण्यात आली. मात्र, संबंधीत शाळा टिचर कॉलनीत हलविण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी तथा शिक्षण विभाग बुलडाणा कळविलेले नसल्याचे बयाण नोंदविले. त्याअनुषंगाने शहर पोलिसांनी संबंधित शाळेविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदविली. तसेच तक्रारकर्ते मो. इमरान मो. इकबाल यांनीही शिक्षण विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी ७ सप्टेंबर २०१९ रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, खामगाव यांना शाळेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, याप्रकरणी गटशिक्षणाधिकाºयांकडून याप्रकरणी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप तक्रारकर्ता आणि परिसरातील नागरिकांचा आहे.
टिचर कॉलनीतील एका इमारतीत मांऊट सिनाई ही शाळा अनधिकृतपणे चालविण्यात येत आहे. गतवर्षी ही शाळा नशीब कॉलनीत सुरू होती. नियमबाह्य पध्दतीने सुरू असलेल्या या संस्थेविरोधात पोलिस आणि शिक्षणाधिकाºयांविरोधात तक्रार केली आहे.- मो. इमरान मो. इकबालतक्रारकर्ते, टिचर कॉलनीमान्यता असलेल्या ठिकाणी शाळा सुरू नाही. या शाळेच्या चौकशी संदर्भात शिक्षण विभागाकडून कोणतेही पत्र आपणांस प्राप्त नाही. तक्रारकर्ता यांना मिळालेल्या पत्राच्या अनुषंगाने बुधवारी शाळेची चौकशी करण्यात आली.- गजानन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगाव.शासन नियमानुसार आपल्या संस्थेला मान्यता आहे. शाळा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात ही शाळा टिचर कॉलनीत हलविण्यात आली आहे. बांधकाम पूर्ण होताच येत्या आठ-दहा दिवसांमध्ये शाळा मान्यता असलेल्या ठिकाणी पूर्ववत सुरू केली जाईल.- शेख याकुब शेख महेबुब, अध्यक्ष- माउंट सिनाई इंग्लीश स्कूल.
शासनाची परवानगी घेवूनच शाळा सुरू केली आहे. शाळेचे स्थलांतर करण्यापूर्वी शिक्षण विभागाला हमी पत्र दिले आहे. शाळेचे बांधकाम पूर्ण होताच ही शाळा वाडी येथे (मान्यता असलेल्या ठिकाणी) हलविण्यात येईल. - शेख ताहेरउपाध्यक्ष-माउंट सिनाई इंग्लीश स्कूल.