शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

कोट्यवधीच्या जमीन खरेदीत शासनाला लाखोंचा चुना

By सदानंद सिरसाट | Published: March 14, 2023 4:35 PM

वर्ग दोनच्या जमिनीची शासकीय किंमत भरण्यास खो

खामगाव : वर्ग दोनची जमीन खरेदी करताना पूर्वपरवानगी आदेशानुसार जमिनीच्या शासकीय किंमतीच्या ५० टक्के रक्कम शासनजमा न करताच थेट खरेदी नोंदवणे, फेरफार घेणे, मालकी हक्क बदलण्याचा प्रकार घडला आहे. त्यातून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथील कोट्यवधी रुपये किमतीच्या आठ एकर जमिनीबाबत घडला आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम अद्यापही शासनजमा झाली नसल्याने हा व्यवहारच अवैध ठरत आहे. त्यावर महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही.

खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथील गट क्रमांक २०८ मधील कसण्यासाठी शासनाकडून बाळापूर फैलातील केशव आनंदा गवई यांना ३.७ एकर, तसेच माजी सैनिक श्रीधर दत्तात्रय धाराशिवकर यांना ३.९५ एकर जमीन मिळाली होती. ती भोगवटादार वर्ग- दाेनची जमीन आहे. गवई यांची जमीन खामगाव येथील नांदुरा रोडवरील रहिवासी नितीन रमेशचंद्र डिडवाणीया, रमेशचंद्र द्वारकादास डिडवाणीया, तर धाराशिवकर यांच्या जमिनीचे खरेदीखत नितीन डिडवाणीया व नेरपरसोपंत येथील पवन लक्ष्मीनारायण अग्रवाल यांच्या नावे सप्टेंबर २००८ मध्ये नोंदवण्यात आले. जमीन वर्ग दोन प्रकारातील असल्याने त्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांचा पूर्वपरवानगी आदेश घेण्यात आला. २७ मे २००८ रोजी उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशात जमिनीच्या शासकीय किमतीच्या ५० टक्के रक्कम शासनजमा करणे आवश्यक होते. मात्र, ती रक्कम शासनजमा न करताच दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत नोंदवण्यात आले. शासकीय जमिनीची खरेदी करताना शासन महसूलालाच चुना लावण्याचा प्रकार घडला आहे. त्यामध्ये संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालयातील संबंधित महसूल लिपिक, दुय्यम निबंधक कार्यालयातील संबंधितांची भूमिकाही संशयास्पद आहे.

रक्कम न भरल्याने आदेशच निष्प्रभपूर्वपरवानगी आदेश देताना वर्ग दोन जमिनीची अनर्जित रक्कम शासन जमा केल्याशिवाय आदेश लागू होत नाही, अशी अट असते. तसेच आदेशाच्या तारखेपासून वर्षभरासाठीच तो वैध असतो. या दोन्ही जमिनीच्या खरेदी प्रकरणात आदेशातील अटीचा भंग झाल्याने संबंधितांनी अवैधपणे खरेदी नोंदवण्याचा प्रकार घडला आहे.

उपनिबंधकांनीही ठेवले बोटसावकारी प्रकरणात आदेश देताना तत्कालीन उपनिबंधक डाॅ. महेंद्र चव्हाण यांनी जमिनीची अनर्जित रक्कम शासन केली नसल्याचे २८ जानेवारी २०२० रोजी नमूदही केले आहे.

याप्रकरणात तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या पूर्वपरवानगी आदेशातील अटींबाबत पडताळणी केली जाईल. भंग निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र कमाल जमीन धारणा कायदा व महसूल अधिनियमाप्रमाणे कारवाई केली जाईल.

- अतुल पाटोळे, उपविभागीय अधिकारी, खामगाव.

टॅग्स :fraudधोकेबाजी