अनिल गवई
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराने बरबटेल्या रेशन घोटाळ्याची अखेर मंत्रालय स्तरावरून चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उप सचिव सतीश सुपे यांनी दिले आहेत. संबंधीत आदेशाचे पत्र गुरूवारी धडकताच जिल्ह्यातील रेशन माफीयांसोबतच पुरवठा विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीतंर्गत वितरीत केल्या जाणाºया रेशनच्या धान्याचा काळाबाजार गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागला होता. वर्षभरातील विविध घटनांमध्ये पाच हजार २२८ पोते धान्यसाठा जप्त करण्यात आला. त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त धान्याचा काळाबाजार झाला. यामध्ये सन २०१७ मध्ये तब्बल १६ प्रकरणांचा समावेश असून, शेगाव, नांदुरा, शेलुद ता. चिखली, धाड, साखरखेर्डा, धोडप, खामगाव येथील दोन प्रकरणं, उमाळा आणि साखळी बु. येथील प्रकरणांचा समावेश आहे. उपरोक्त १६ पैकी १४ प्रकरणांमध्ये (शेलूद ता. चिखली २२ जून २०१७) आणि (खामगाव २० आॅगस्ट २०१७) या प्रकरणात वाहतूक कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उर्वरीत १४ प्रकरणांमध्ये सत्य माहिती लपवून पुरावे नष्ट करून कनिष्ठ लोकांवर थातुरमातुर कारवाई करण्यात आली. दरम्यान, २७ मार्च २०१८ रोजी खामगाव येथील चिखली नाक्यावर गव्हाची अफरातफर प्रकरणी ट्रकचालक, जिल्हा पुरवठा विभागाचे वाहतूक प्रतिनिधी आणि वाहतूक कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातही आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न झालेत. परिणामी, या संपूर्ण प्रकरण बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी लावून धरले. यासंदर्भात त्यांनी पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल केली. सोबतच ह्यलोकमतह्णनेही वेळोवेळी जिल्ह्यातील रेशन घोटाळा चव्हाट्यावर आणला. जिल्ह्यातील रेशन घोटाळ्यात पुरवठा विभागातील कर्मचारी सहभागी असल्याचे अधोरेखीत झाल्यानंतर आता या प्रकरणाची मंत्रालय स्तरावरून सखोल चौकशी करण्यात येणार असूनच चौकशीसाठी औरंगाबाद पुरवठा विभागाचे पुरवठा उपायुक्त यांची नेमणूक करण्यात आली आहे.
‘लोकमत’चा पाठपुरावा ठरला फलदायी!
जिल्ह्यात रेशन धान्याच्या काळा बाजार प्रकरणी ‘लोकमत’ने सुरूवातीलपासूनच पाठपुरावा केला. बहुतांश घटनानंतर बातमी मागच्या बातमीही प्रकाशित केल्या. २७ मार्च २०१८ रोजी उघडकीस आलेल्या गहू अफरातफर प्रकरण केवळ ‘लोकमत’ने तडीस नेले. परिणामी आता जिल्ह्यातील रेशन घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी होत असल्याने ‘लोकमत’चा पाठपुरावा फलदायी ठरल्याची चर्चा आहे.
रेशन धान्याचे मराठवाडा कनेक्शन!
१५ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी साखळी बु. येथील एका स्वस्त धान्य दुकानासाठी गहू-१३५ क्ंिवटल, तांदूळ- ३५ क्विंटल आणि साखर असे मिळून सुमारे ३४० पोते शासकीय धान्य वाहतूक कंत्राटदाराच्या वाहन क्रमांक एम एच १९/ ४४३२ द्वारे पाठविण्यात आले. मात्र, हे धान्य संबंधीत स्वस्त धान्य दुकानदाराच्या दुकानामध्ये न पोहचता ते मराठवाड्यात काळ्या बाजारात विकल्या गेल्याची बाब तहसीलदार बुलडाणा समजली. तहसीलदार यांनी १५ डिसेंबरच्या रात्रीच त्या दुकानाची चौकशी करण्यासाठी अधिनस्त अधिकाºयांना पाठविले. दरम्यान, या दुकानात शासकीय धान्य पोहोचले नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पंचनामाकरून धान्य दुकान सिल करण्यात आले.
तीन सदस्यीय चौकशी!
सदर गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदार बुलडाणा यांनी निरिक्षण अधिकारी व नायब तहसीलदार यांच्यासोबतच चौकशीकरून १५ डिसेंबर २०१२ रोजी वाहतूक पास क्रमांक ९९६ व ९९७ वाहन क्रमांक एम.एच. १९ ४४३२ या वाहनातून साखळी बु. येथे पाठविण्यात आलेले रेशन धान्य साखळी बु. येथे पोहोचले नाही. त्यामुळे सविस्तर चौकशी अंती वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट अमरावती प्रो. पा. पन्नालाल चोखेलाल गुप्ता तर्फे मुख्त्यार सतीश चोखेलाल गुप्ता सदर अफरातफरीस प्रथमदर्शनी जबाबदार दिसून येत असल्याचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाºयांना सादर करण्यात आला.
वाहतूक कंत्राटदारास कारणे दाखवा!
याप्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी वाहतूक कंत्राटदारास कारणे दाखवा नोटीस बजावली. १७ डिसेंबर रोजी जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी तहसीलदारांना निर्देश देत कंत्राटदाराचे वाहन टोलनाक्यापुढे नादुरूस्त झाल्याने पंचनामा करून सदर धान्य स्वस्त धान्य दुकानात उतरविण्याचे कळविले. मात्र, सदर बाब चुकीची ठरवित तहसीलदारांनी सदर वाहन १५ आणि १६ डिसेंबर २०१७ रोजी मार्गावर आढळून आले नसल्याचा अहवाल १८ डिसेंबर रोजी दिला. तसेच अहवाल सादर करेपर्यंत वाहतूकदाराने त्याचे वाहन नादुरूस्त असल्याबाबत कोणतीही सूचना दिली नसल्याचेही अधोरेखीत केले.
पुरवठा अधिकाºयांनी सोडले वाहन
दरम्यान, १९ डिसेंबर रोजी पुरवठा अधिकाºयांनी रेशन दुकानाचे सील तोडून संबधीत धान्य दुकानात उतरवून दिले. त्यानंतर वाहतूक कंत्राटदाराचे वाहन सोडून दिले. उपरोक्त घटनाक्रमावरून जिल्ह्यातील रेशनमालाच्या काळ्या बाजार पुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याची वसुनिष्ठ तक्रार बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे माजी आ. विजयराज शिंदे यांनी केली. तसेच ‘लोकमत’नेही वेळोवेळी हा प्रकार उघडकीस आणला. परिणामी, बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश उपसचिव सतीश सुपे यांनी दिले आहेत. या चौकशीसाठी औरंगाबाद येथील पुरवठा उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली असून, यासंदर्भात १२ एप्रिल २०१८ रोजी बुलडाणा पुरवठा विभागाल पत्र प्राप्त झाल्याचे समजते.
गोर गरीब जनतेच्या तोंडचे धान्य पळविणाºया टोळीचा या चौकशीमुळे पर्दाफाश होईल. कंत्राटदारासोबत अधिकाºयांचेही साटेलोटे उघड होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रेशन घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात माध्यमांचीही भूमिका महत्वाची राहीली आहे.
- विजयराज शिंदे
माजी आमदार, बुलडाणा