मेहकर तालुक्यातील माळेगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणींसोबत येथील हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी दररोज येते. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी तिला एका नातेवाइकाने दुचाकीवर शाळेत सोडले होते. त्यानंतर तिला घेण्यासाठी पुन्हा ते परत शाळा सुटल्यानंतर आले असता विद्यार्थिनी वर्गातून बाहेरच आली नाही. तिच्या नातेवाइकांनी शाळेतील तिच्या मैत्रिणींना विचारले असता त्यांनाही याबाबत माहिती नव्हती. त्यामुळे तिचा बराच शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या आईने जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
--पालकवर्गात भीतीचे वातावरण--
या घटनेमुळे जानेफळ परिसरातील ग्रामीण भागातील पालकवर्ग चिंतेत सापडला आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, विद्यार्थिनी जानेफळ येथे शिक्षणासाठी येतात. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या घटनेबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहे.