लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लॉकडाऊन नंतर जिल्ह्यात जवळपास ९० उद्योग सुरू झाले असून त्यातंर्गत एक हजार १२५ कामगारांना काम मिळाले आहे. त्यामुळे मुळातच डी प्लसमध्ये असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील उद्योगांना आता काही प्रमाणात चालना मिळण्यास प्रारंभ झाला आहे.फिजिकल डिस्टन्सिंगसह काही अटी व शर्थींच्या आधारावर ही परवानगी देण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे खामगाव, मलकापूर येथील कामगारांना समस्यांना सामोरे जावे लागले होते. सध्या मलकापूर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मात्र २० एप्रिल नंतर अत्यावश्यक सेवा म्हणून बुलडाणा जिल्ह्यात नऊ उद्योग पुन्हा सुरू करण्यात आले होते.आता २३ जूनच्या आसपास जिल्ह्यात ९० उद्योग सुरू झाले आहेत. त्यामध्ये एक हजार १२५ कामगार काम करत आहेत. जिल्ह्यात प्रामुख्यो खामगाव व मलकापूर येथेच उद्योग एकवटलेले आहेत.जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतंर्गत ८८ उद्योग आणि कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योग तथा फुड इंडस्ट्रीमधील उद्योग मिळून हा ९० चा आकडा गाठल्या गेला आहे. प्रामुख्याने जिल्ह्यात दालमील, तेल उत्पादन, जिनींग उद्योगांना परवानगी देण्यात आलेली आहे. यातील काही उद्योग हे २० एप्रिल नंतरच सुरू झाले होते. त्यामुळे आता हे उद्योग बऱ्यापैकी स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. तरी कोरोना संसर्गाचा जिल्ह्यात सध्या सुरू असलेला कहर पाहता सुरक्षेला प्राधान्य या उद्योगामध्ये काम करणाऱ्यांना द्यावे लागणार आहे. अन्यथा संसर्ग अटळ आहे.
अमरावती विभागात ७६३ उद्योग सुरूअमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आमि अमरावती या पाच जिल्ह्यात एक हजार ११५ उद्योगांना परवागी देण्यात आलेली असून त्यापैकी ७६३ उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. या उद्योगांमध्ये सध्याच्या स्थितीत ११ हजार ९०२ कामगार कार्यरत आहेत.