लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर हे दुस-यांदा खामगांव विधानसभा मतदार संघातून निवडून आले. खामगांव विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीची मजबूत पकड असून आमदार आकाश फुंडकरांचा हा अनुभव लक्षात घेता त्यांना बुलढाणा जिल्हा भाजपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. आमदार ॲड. आकाश फुंडकर हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, नगर सचीव, अखिल भारतीयविद्यार्थी परिषद,जिल्हाध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी पदी त्यांनी काम पाहिले आहे. यासोबतच त्यांनी संसदीय कार्य समिती सदस्य, अंदाज व नियोजन समिती सदस्य, सार्वजनिक उपक्रम मंडळ समिती, दक्षता व संनियंत्रण समिती या समित्यांवर त्यांनी काम पाहिले आहे. तसेच 2019 मध्ये त्यांची भाजपाच्य विधी मंडळप्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली होती. 03 मार्च रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांची एका पत्रकाव्दारे केली. तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. मागील अनेक वर्षापासून काँग्रसचे वर्चस्व असलेल्या खामगांव विधानसभा मतदार संघावर आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात मागील 6 वर्षापासून मजबून पकड बनवत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेवर भाजपाचे सदस्य निवडून आणून हया संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकविला आहे. त्यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे जिल्हयातील भाजपा प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भाजपा बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 2:07 PM