बुलडाणा: पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमुलकर हे चंद्रपूर जिल्ह्यात दौऱ्यावर असताना ऑक्सीजन सिलींडरची कॅप व लॉकची पाहणी करताना घडलेल्या किरकोळ अपघातात जखमी झाले आहेत.
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आक्सापूर येथील आरोग्य वर्धिनी उपकेद्राच्या पाहणीदरम्यान १० फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. आ. रायमुलकर हे सध्या पंचायत राज समितीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. तेथे आरोग्य उपकेद्रातील ऑक्सीजन सिलींडरची पाहणी करताना ही घटना घडली. यात त्यांच्या हाताला किरकोळ जखमी झाली आहे. सुदैवाने या घटनेत गंभीर अशी इजा झाली नसल्याचे त्यांच्या सोबतच असलेले स्वीय सहायक रुपेश गणात्रा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सध्या त्यांचा पीआरसीचा दौरा सुरू असल्याचेही ते म्हणाले.