चिखली : आमदार श्वेता महाले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली बसस्थानकामध्ये अपंग आणि वयोवृद्ध व्यक्तींना ने-आण करण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या आहेत.
दिव्यांग व वयोवृध्दांना बसमध्ये चढणे-उतरणे व फलाटावर ने-आण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने अनेकांची हेळसांड होत होती. अनेकांना उचलून नेल्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. याची दखल घेत आ. श्वेता महाले यांनी दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तींच्या सुविधेसाठी स्वखर्चातून व्हीलचेअर भेट दिली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बसस्थानकामध्ये त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, रामदास देव्हडे, न. प. सभापती विजय नकवाल, नगरसेवक नामु गुरुदासानी, विजय खरे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, अॅड. संजय सदार, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, नितीन गोराडे, सागर पुरोहित, सचिन शेटे, सचिन कोकाटे, सुभाषअप्पा झगडे, स्वीयसहाय्यक सुरेश इंगळे, आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे, नूतन जाधव, अरूण सोनाळकर, सागर परदेशी, अनंता सानप, बद्री महाले, गुलाब जाधव, आशिष देव, संतोष ढोणे, संदीप राऊत, समाधान खोडके, प्रकाश परिहार, गजानन परिहार, सचिन सुनगत, मंगेश मावस्कर, येळवंडे, विश्वनाथ गिते, सागर जाधव, जावळे, उमेश भोलाणे, गजानन बांडे, परमेश्वर मगर, रूपाली जाधव यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी) ..............................