शहरातील रामनगर मध्ये दररोज रात्री मोकाट जनावरे जमतात. त्यांचे मालक महिना महिना या जनावरांना बघायला येत नाहीत. ११ जून रोजी रात्री ९ पासून एक गोऱ्हा अत्यवस्थ अवस्थेत पडून होता. शनिवारी सकाळी आमदार संजय रायमुलकर यांना ही बाब कळल्यावर ते तत्काळ पोहोचले. त्यांनी पशु चिकित्सालयमधील डॉ. राजेश बोरकर यांना बोलावून घेतले. त्यांच्या सोबत राजेश यावले व डॉ. प्रवीण विणकर सुद्धा होते. स्वतः आमदार संजय रायमुलकर यांनी वैद्यकीय टीमच्या सहकार्याने उपचार केले. दोन तास आमदार रायमुलकर त्या ठिकाणी उपस्थित होते. यादरम्यान या गोऱ्ह्याचे मालक घटनास्थळी हजर झाले. त्यांच्या घरी हा गोऱ्हा पुढील उपचारासाठी पाठवून दिला. यावेळी शिवसेना नगरसेवक विकास जोशी, प्रदीप जोशी, नगरसेवक नीलेश सोमण, केदारमल सारडा, बलदेव सारडा, संतोष मलोसे, रघुवीर जोशी, जीवन शर्मा, सुभाष लहाने, रा.काँ युवक शहर अध्यक्ष सनी मोरे, आनंद रहाटे, पवन आसाबे, आकाश सावळे, स्वच्छता निरीक्षक संजय गीरी, स्वीय सहायक विलास आखाडे, डॉ. नालिंदे, केशव गिऱ्हे, न. प. कर्मचारी गुड्डू गवळी, अविनाश डंढोरे, विजय चंडाळे हजर होते.
अत्यवस्थ अवस्थेतील गोऱ्ह्यावर आमदारांनी केले उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:46 AM