ग्रामीण रस्त्यांच्या दुरवस्था साठी जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार असल्याचा ठपकाही मनसेच्या आंदोलकांनी ठेवला आहे. या प्रश्नी वारंवार निवेदने देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मनसेने हे आंदोलनात्मक पाऊल उचलले आहे. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास दोन हजार किमी लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत. त्यापैकी जवळपास निम्मे रस्ते खराब झालेले आहेत. त्यांची त्वरेने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे यावेळी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख मदन राजे गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील मनसेचे तालुकाध्यक्ष गजानन टेकाळे, शहराध्यक्ष मनोज पवार, शहर उपाध्यक्ष अनिल माेरे, योगेश विसपुते, अंकित मिसाळ, विजय पडोळ, राहुल चौधरी, उमेश नाटेकर, प्रेम सोनोने, बाळराजे देशमुख, राजू मांटे, गजानन टेकाळे, शिवचरण खोंड, अनिल वाघमारे यांच्यासह अन्य सहभागी झाले होते. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी ही केली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांना निवेदन देऊन या प्रश्नी त्यांच्याशी चर्चाही करण्यात आली.
--पीक विम्यासाठी ही आंदोलन --
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानाचा पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे हा पीक विमा मिळावा अशी मागणीही मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत करण्यात आले. यावेळी सोयाबीनच्या झाडांची माळ गळ्यात घालून मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करत जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली.