मुले कायम मोबाइलवर
लहान मुलांनी जास्त वेळ फोन वापरणे घातक असल्याचे मत नेत्र तज्ज्ञ डॉ. संजय ठोकरे यांनी व्यक्त केले आहे. मुले कायम मोबाइलवर राहत असल्याने त्यांना डोळ्यांच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण होत आहेत. डोळे कोरडे पडणे, डोळ्यांत जळजळ होणे, पुरेशी झोप न होणे, डोके दुखणे यांसारखे त्रास मुलांना होत आहेत. शिवाय चष्मा असेल तर त्याचा नंबरही वाढतो, अशी माहिती नेत्र तज्ज्ञ डॉ. संजय ठोकरे यांनी दिली.
विटी-दांडू गायब
विटी-दांडू हा खेळ तर अनेक मुलांना आता माहीतही नाही. शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही काही मैदानी खेळांची माहितीच मुलांना नाही. विटी-दांडू, हुतूतू, मामाचं पत्र हरवलं यांसारख्या मैदानावरून गायब होत चाललेल्या खेळांना ऑनलाइनचे नवे मैदान मिळाले आहे.
कोरोनामुळे मोबाइल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले
कोरोनामुळे मुलांना घरातच खेळा, बाहेर पडू नका, अशी तंबी पालकांकडून दिली जात आहे. त्यामुळे मुले मोबाइलवर गेम खेळण्यातच आपला वेळ घालवत आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे प्रत्येक मुलाच्या हातात मोबाइल आला. त्यामुळे मुलांमध्ये मोबाइलवर गेम खेळण्याचे प्रमाण वाढले. मोबाइलमुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.