- अनिल गवईखामगाव: आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्यासाठी जिल्ह्यातील पालिका प्रशासन कामाला लागले असून, पंतप्रधान आवास योजनेत गेल्या काही दिवसांपासून गतिमानता आल्याचे चित्र आहे. यामध्ये खामगाव शहरात घरकुलासाठी साडेसहा हजार अजार्चे वितरण करण्यात आले आहे.सर्वांसाठी घरे हे ब्रिद असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ २५ जून २०१५ रोजी करण्यात आला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या लाभार्थ्यांसाठी चार भागांची वेगळी योजना असे या योजनेचे खास वैशिष्टे आहे. यामध्ये जिल्ह्यातील खामगाव- ३५१९, बुलडाणा- २७८३, मलकापूर- २६७१ आणि चिखली-२३४१ या चार शहरांमधील ११ हजार ३४० घरकुलांचा समावेश असून, उर्वरीत मेहकर, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मोताळा आणि संग्रामपूर या नऊ पालिका आणि पंचायतींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ९ हजार ६५६ घरकुलांचे उद्दीष्ट २०१७- २०२२ या कालावधीसाठी निधार्रीत करण्यात आले आहे. दरम्यान, खामगाव पालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची नेमणूक केली असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत शहराच्या विविध भागात सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. यामध्ये तब्बल साडेसहा हजार अजार्चे वितरण करण्यात आले. तसेच ७० सर्वेक्षकांच्या माध्यमातून जवळपास तीन हजाराच्यावर अर्ज भरून घेण्यात आले आहेत.
खामगावात साडेसहा हजार अजार्चे वितरण!पंतप्रधान आवास योजनेला खामगाव शहरात कमालिची गती प्राप्त झाली असून, या योजनेच्या सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर ६५ ते ७० सर्वेक्षकांद्वारे पंधरा-वीस दिवसांमध्ये तब्बल साडेसहा हजार अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. परिणामी, उद्दीष्टापेक्षा घरकुल लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसते. दरम्यान, २४ जानेवारीपर्यंत खामगाव पालिकेत तीन हजार नागरिकांनी अर्ज भरून दिल्याची माहिती आहे.
बुलडाण्यासह सहा पालिकांचा समावेश!पंतप्रधान आवास योजनेचे निर्धारित उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी खामगाव पालिकेसह बुलडाणा, चिखली, मलकापूर, शेगाव, देऊळगाव राजा आणि लोणार या नगर पालिकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसून येते. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात शेगाव पालिकेची कामगिरी सरस असल्याने, पंतप्रधान आवास योजनेच्या उद्दीष्टपूतीर्साठी या पालिकेची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.
खामगावात सर्वाधिक घरकुल!जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या तुलनेत खामगाव शहरात सर्वाधिक ३५१९ घरकुलांचे उद्दीष्ट असून, बुलडाणा शहरात २७८३ घरकुलांचे तर २६७१ घरकुलांसह मलकापूर तालुका घरकुलांच्या उद्दीष्टांमध्ये तिसºयास्थानी असल्याचे दिसून येते.