बुलडाणा : काँग्रेसच्या राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी, महागाई वाढली त्यामुळे आता येणार्या काळात राजकारणाच्या शेतात वाढलेले काँग्रेस राष्ट्रवादीचे तण फेकून द्या व मोदी विचारांची शेती करा असे आवाहन करीत योगेंद्र गोडे यांच्या पाठीशी राहून परिवर्तनाचे शिलेदार व्हावा अशी हाक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दवेंद्र फडणवीस यांनी दिली.बुलडाणा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार योगेंद्र गोडे यांच्या प्रचारासाठी आयोजीत सभेत ते बोलत हो ते अध्यक्षस्थानी आमदार डॉ.रणजीत पाटील हे होते तर मंचावर योगेंद्र गोडे यांचे सह गोकुल शर्मा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, जगदेवराव बाहेकर, अँड. व्ही. डी. पाटील, एकनाथ खर्चे, विजया राठी, वैशाली डाबेराव, दत्ता खरात, दत्ता पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात योगेंद्र गोडे यांनी बुलडाण्यात मेडीकल कॉलेज उभारण्याची केलेली मागणी तात्काळ मान्य करीत भाजपाची सत्ता आल्यास प्रत्येक जिल्ह्यात एक मेडीकल कॉलेज देऊ अशी घोषणा केली. व्ही.डी.पाटील यांनी पक्षाचा आदेश माननारा मी कार्यकर्ता आहे अशाच आदेशाचे आपण पालन करून गोडे यांच्या पाठीशी रहा असे आवाहन केले. योगेंद्रने घेतलेली आघाडी कायम ठेवाभाजपाने बुलडाण्यात तरूण, तडफदार व सुशिक्षीत असा उमेदवार योगेंद्र गोडे यांच्या रूपाने दिला आहे. गोडे यांनी पक्षाचे काम तात्काळ हाती घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. ही आघाडी अशीच कायम ठेवा व राज्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी गोडे यांना विजयी करा असे भावनिक आवाहन फडणवीस यांनी प्रचार सभेत केले.
मोदी विचारांची शेती करा
By admin | Published: October 02, 2014 11:33 PM