काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विदर्भ दौऱ्यावर असलेले नाना पटोले यांचे जिल्ह्यात प्रथमच ९ जून रोजी आगमन झाले. यावेळी त्यांनी चिखली येथे कोरोना कालावधीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास चिखलीत दाखल झालेले असतानाही त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्व बाबी जाणून घेतल्या. जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून रजत गणेशाची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. आ. कुणाल पाटील, वजहात मिर्झा, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, नाना गावंडे, नाना देशमुख, प्रदेश प्रवक्ते अतुल लोढे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश महिला सरचिटणीस जयश्री शेळके, लक्ष्मणराव घुमरे, नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, हाजी रशिदखॉ जमादार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पटोले यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. कोरोना कालावधीतील कार्याबाबत समाधान व्यक्त केले. तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी यांच्यासह पक्षाचे लोकप्रतिनिधी, विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नीलेश अंजनकर व खंडाळा मकरध्वज येथील देवीदास गोविंदराव ठेंग, गजानन आत्माराम ठेंग यांनी राहुल बोद्रेंच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवित काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. सूत्रसंचालन डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केले.
मोदी सरकारची कर्जमाफी फसवीच : नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:24 AM