भत्त्यात वाढ, ग्रामसेवकांना दिलासा
बुलडाणा : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता दीड हजार रुपये प्रवास भत्ता मिळणार असल्याने ग्रामसेवकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर ०.६८ टक्के
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच, मृत्यूचे प्रमाणही चांगलेच वाढलेले आहे. मागील आठवड्यात जास्त मृत्यू झाले होते, परंतु आता हे प्रमाण कमी होत आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर हा ०.६८ टक्के आहे.
बँकांमध्ये वाढतोय कोरोनाचा धाेका
बुलडाणा : कोरोना वाढत असतानाही बँकांमधील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. पेन्शनसह पीक कर्जासाठी बँकांमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बँकांमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे.
अंगणवाडीमध्ये आरोग्य तपासणी
देऊळगाव राजा : बदलत्या वातावरणामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील अंगणवाडींमध्ये आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात यावे, अशी मागणी रूपेश जाधव यांनी केली आहे.
पशुधनास वेळेवर उपचार मिळणे कठीण
मेहकर : तालुक्यातील अनेक पशुधन विभागातील अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत आहेत. कोरोनामुळे कर्मचारी कामावर येत नाहीत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. परिणामी पशुधनास वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे.
८८ टक्के कार्डधारक नियमित स्वस्त धान्य उचलतात
बुलडाणा : सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत स्वस्त धान्य न घेणाऱ्या ग्राहकांची नावे अंत्योदय अथवा प्राधान्य यादीतून कमी करण्यात येत आहेत. जिल्ह्यात एकूण रेशनकार्डधारकांपैकी ८८ टक्के कार्डधारक नियमित स्वस्त धान्य उचलतात. त्यामुळे उर्वरित कार्डधारकांच्या ठिकाणी गरजवंतांना त्यात समाविष्ट करण्यात येत आहे.
बुलडाण्यातील प्रमुख रस्त्यावर अंधार
बुलडाणा : शहरातील प्रमुख मार्गावर रात्रीच्यावेळी पथदिवे बंद असल्याने अंधार असतो. धाड नाका ते सर्क्युलर रोडपासून पेट्रोलपंपापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरही रात्रीच्यावेळी अंधार असतो.
पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर
बुलडाणा : तालुक्यातील पाच गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता काही महिन्यांपूर्वी मिळाली होती. देऊळघाट परिसरातील गावांचा यामध्ये समावेश आहे. सध्या या योजनेसाठी ९० टक्क्यांपेक्षा अधिक निधी उपलब्ध झाला आहे. योजनेचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे.
टीबी, एचआयव्ही रुग्णांची तपासणी
बुलडाणा : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे टीबी आणि एचआयव्ही रुग्णांचीही कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीकडून कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींवरही आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले पाहिजे.
विवाह सोहळ्यावर नजर
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळे बेकायदेशीररित्या पार पडणार नाहीत, याची दक्षता शहरी भागात संबंधित मुख्याधिकारी नगर पालिका तसेच ग्रामीण भागात संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नियमानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या निर्देशही आहेत.