शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

माकड जेरबंद; मोताळावासीयांनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास

By admin | Published: September 22, 2016 1:30 AM

बुधवारी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून माकाडाला जेरबंद केले.

मोताळा(जि. बुलडाणा), दि. २१- मागील दोन आठवड्यांपासून येथील तहसील कार्यालयासह पंचायत समिती परिसरात धुमाकूळ घालून दहशत पसरविणार्‍या माकाडाला बुधवारी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून बसस्थानक परिसरातून जेरबंद केले. गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयासह पंचायत समिती परिसरात एका पिसाळलेल्या माकडाच्या र्मकटलीलांनी नागरिकांना जेरीस आणले होते. या माकडाने ११ स प्टेंबर रोजी शुभम ज्ञानदेव वले या विद्यार्थ्याला जखमी केले होते, तर १२ सप्टेंबर रोजी याच माकडाने तहसील कार्यालयात प्रचंड धुमाकूळ घालून सेवानवृत्त शिपाई राजाराम चव्हाण, करवा जाधव, राजू शिंदे, प्रशांत इंगळे यांना चावा घेऊन चांगलीच दहशत पसरवली होती. माकडाच्या हैदोसाने त्रस्त झालेल्या परिसरातील महिलांनी मंगळवारी वन विभागाच्या कार्यालयात धाव घेऊन माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. दरम्यान, माकडाला पकडण्यासाठी २१ सप्टेंबर रोजी वन विभागाने पहाटे पाच वाजेपासून रेस्क्यू ऑपरेशन राबविले. यासाठी बुलडाणा येथून ट्रॅक्विलायझर गनसह आलेल्या रेस्क्यू टीमने दहशत पसरविणार्‍या माकडाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. ट्रॅक्विलायझर गनद्वारे त्याला चार वेळेस इंजेक्शन मारण्यात आले. तिसर्‍या व चौथ्या इंजेक्शनच्या प्रभावामुळे सदर माकड बेशुद्ध झाले.