बुलडाणा : जिल्ह्यातील रविवारी सकाळी पाऊस व गारपीटीमुळे ५० पेक्षा अधिक गावांना गारपीटीचा फटका बसला आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यात आठ ते नऊ शेतमजूर गारपीटीमध्ये (फ्रॉस्टबाईट) जखमी झाले आहेत. या वादळी वा-या सह झालेल्या गारपीटीमुळे रब्बी पिकांचे जिल्ह्यात नुकसान झाले आहे.प्राथमिक स्तरावरील माहितीमध्ये रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात ही गारपीट झाली असून लोणार तालुक्यात १८ गावे, बुलडाणा तालुक्यातील अंत्रीतेली, वरवंड, पलढग, डोंगरखंडाळा, खेर्डी, चिखली तालुक्यात हातणणी, डोंगरशेवली, धोडप, चांदई, सिंदखेड राजात पिंपळखुटा, शेंदुरजन, दरेगाव, वाघाळा, संग्रामपूर तालुक्यात पातुर्डा, सोनाळा, बोरखेड, नेकनापूर, संग्रामपूर, धामणगाव गोतमारे, करमोडा, लाडणापूर, मारोड, नांदुरा तालुक्यात हिंगणा, बोटा, इरतपूर, दादगाव, नारखेड, निमगावसह अन्य भागाला गारपिटीचा मोठा तडाखा बसला प्रारंभी १५ ते २० मिनिटे गारपीट झाल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागातपावसाने हजेरी लावली. संग्रामपूर तालुक्यात तर प्रारंभी बोरा एवढ्या पडणा-या गारा नंतर थेट लिंबाच्या आकाराएवढ्या पडल्याने शेतातात काम करणारे मारोड परिसरातील आठ ते दहा मजूर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संग्रामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी स्पष्ट केले. प्रारंभी हरबरा, बोराच्या आकाराच्या पडणा-या या गारी अचानक लिंबाच्या आकाराच्या पडू लागल्याने शेतात कामासाठी जाणा-या मजुरांना फटका बसला. या पावसामुळेगहू, हरबरा, कांदा, आंबे, द्राक्षबागांचे मोठे नुकसान केले आहे.महसूल यंत्रणा शेतातगारपिटीचा इशारा आधीच दिलेला असल्याने महसूल यंत्रणा सतर्क होती. त्यामुळे गारपिटीमुळे अधिक प्रमाणात प्रभावीत झालेल्या गावांमध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि यंत्रणा पोहोचली आहे. सोबच चिखलीचे आ. राहुल बोंद्रे यांनीही चिखली तालुक्यातील प्रभावीत भागात तहसिलदार मनीष गायकवाड यांच्यासह पाहणी केली. देऊळगाव राजा तालुक्यात तहसीलदार दीपक बाजर स्वत:कर्मचार्यांसह पाहणी करीत आहेत.६ ते १० एमएम आकाराच्या गारीसंग्रामपूरसह जिल्ह्यातील काही भागात सहा ते दहा एमएम आकाराच्या गारी पडल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे काही शेतमजूरही यामुळे जखमी झालेले आहते. प्राथमिक वृत्तानुसार आठ ते दहा मजूर संग्रामपूर तालुक्यात जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. पंरतू जसजशी माहिती आपत्ती व्यवस्थापनास विभागास येत आहे तस तसे गारपिटीचे स्वरुप स्पष्ट होत आहे.२०१४ ची आठवण--आजच्या गारपिटीमुळे २०१४ मधील गारपीटीची आठवण होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०१४ मध्ये तब्बल ४०२ गावात तुफान गारपीट झाली होती. यामध्ये जीवितहानीसह पशुधनाचीही मोठी हानी झाली होती. २०१४ च्या उन्हाळ्यात झालेली ही गारपीट ऐतिहासिक होती. त्यावर्षी तब्बल ४ वेळा जिल्ह्यात गारपीट झाली होती. ४०२ गावांपैकी तब्बल ८१ गावामध्ये तीन वेळा गारपीटीचा तडाखा बसलाहोता. लोणार तालुक्यातील १७ ते १८ गावे यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाधीत झाली होती. लोणारच्या सिमावर्ती भागातील एका गावात तर तापमान गारपिटीमुळे शून्य डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले होते तर बोरखेडी परिसरातील विहिरीत साचलेला गारांचा ढिग तब्बल चार दिवस वितळला नव्हता. बुलडाणा जिल्ह्यात १९८५ पासून गारपीट होत असल्याचे पुरावे महसूल प्रशासनाकडे आहेत. तत्कालीनजिल्हाधिकारी किरण कुरंदकर यांनी व्यक्तीश: हा मुद्दा हाताळत गारपिटीचा बुलडाणा जिल्ह्याचा इतिहास शोधून काढला होता.
बुलडाण्यात ५०पेक्षा अधिक गावांना गारपिटीचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 2:54 PM