- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोविड बाधितांवर उपचार करण्यात येत असले तरी सध्या नवीन कोविडबाधित आढळण्याची संख्या रोडावल्याने या कोविड रुग्णालयांमधील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बेड रिक्त आहेत. कोविड संकटाच्या काळात ही बाब आरोग्य यंत्रणेसह नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात सर्वसाधारण, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, आयसीयू अशा एकूण २,६२७ रुग्ण खाटांची व्यवस्था आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात ८०५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे तर १०३ रुग्ण उपचार घेत असून, ७०२ बेड रिक्त आहेत. तसेच आयसीयू बेड ४८७ असून २५ रुग्ण उपचार घेत आहे तर ४६२ बेड रिक्त आहेत. १०५ व्हेंटीलेटर बेड असून, एक रुग्ण उपचार घेत आहे, उर्वरित बेड रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण १,२३० सर्वसाधारण बेड असून ५४ रुग्ण उपचार घेत आहेत तर १,१७६ बेड रिक्त आहेत. सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावल्याने या कोविड केअर सेंटरमध्ये बेड रिक्त आहेत. जिल्ह्यात एक महिन्याआधी दुसऱ्या लाटेत १ हजारापेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळत होते. यामध्ये घट होऊन आता दररोज ४० ते ५० रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५,४२,५७५ आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८६,१६८ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ८५,४१९ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ९६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात कोविड हॉस्पिटलमधील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बेड रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 12:29 PM