बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून मंगळवारी आणखी दाेघांचा मृत्यू झाला तर ५७९ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. गुंज ता. सिंदखेड राजा येथील ७५ वर्षीय पुरुष व केसापूर ता. बुलडाणा येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १ हजार ८८५ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले असून, ३९२ जणांनी काेराेनावर मात केली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शेगांव शहरातील ५७, शेगांव तालुका माटरगांव १, जानोरी १, लासुरा १, कालखेड ५, पहुरजिरा ३, खामगांव शहर ३५, खामगांव तालुका घाटपुरी १, लाखनवाडा २, कुंबेफळ १, लांजुड ५, लोणी गुरव ३, भालेगांव बाजार १, शहापूर ७, नांदुरा तालुका नायगांव १, जळगांव जामोद शहर १०, जळगांव जामोद तालुका जामोद १, मडाखेड १, पिं. काळे २, आसलगांव २, बोराळा १, कुरणगड १, बुलडाणा शहर ३७, बुलडाणा तालुका करडी ४, पळसखेड भट १, पिं. सराई १, शिरपूर १, वरवंड २, साखळी ४, माळविहीर १, सुंदरखेड १, गिरडा १, कोलवड १, मोताळा शहर ३, मोताळा तालुका रोहीणखेड २, चिखली शहर ८६, चिखली तालुका : डोंगर शेवली १, येवता १, मेरा बु १, असोला नाईक १०, उंद्री १, काटोडा २, अमडापूर ३, वरूड १, मलगी १, सावरगांव डुकरे ३, अंत्री तेली १, सातगांव भुसारी १, खैरव १, पार्डी १, अंत्री कोळी १, शेलगांव आटोळ १, भोगावती १, शेलूद १, येवता १, गोद्री १, भानखेड १, शिंदी हराळी १, अंत्री खेडेकर २, शेलगांव जहागीर १, एकलारा ४, भारज १, मुंगसरी १, चांधई २, बेराळा १, तेल्हारा १, सवणा ७, वाघापूर १, बोरगांव काकडे २, किन्होळा ४, करतवाडी १, दिवठाणा १, दे. घुबे १, ब्रम्हपुरी १, संग्रामपूर तालुका पातुर्डा १, सोनाळा ९, टुनकी १, वानखेड २, नांदुरा शहर २३, नांदुरा तालुका वडनेर १, जवळा बाजार १, बेलूरा १, निमगांव १, नारखेड १, सिं. राजा शहर २२, सिं. राजा तालुका चंदनपूर १, सावंगी भगत १, साखरखेर्डा ५, हिवरखेड पुर्णा २, मलकापूर शहर ३९, मलकापूर तालुका तालसवाडा १, मेहकर तालुका मोळा १, जानेफळ १, कळमेश्वर ९, सारशिव १, पार्डा ४, गोहेगांव १, सावत्रा १, उकळी १, दे. माळी ३, मेहकर शहर १२, लोणार शहर ५, लोणार तालुका वढव १, उऱ्हा १, पळसखेड ३, सुलतानपूर १, सावंगी माळी ३, धानोरा १, पारडा २, शिवणी पिसा २, दे. राजा शहर ३०, दे. राजा तालुका डोढ्रा १, आळंद १, सिनगांव जहागीर ३, दे. मही ३, दगडवाडी १, पिंपळगांव चिलमखा १, उमरद १, दगडवाडी १, अंढेरा २, निमखेड १, नागणगांव २, कुंभारी १, मूळ पत्ता विव्हळा ता. पातूर जि. अकोला २, नागपूर १, राजूर ता. बोदवड १, सिनगांव जि. जालना १ संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे.
२२ हजार ४०० काेराेनाबाधित
जिल्ह्यात आज अखेर एकूण २२ हजार ४०० कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १९ हजार १६८ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३ हजार २९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २०३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.