बुलडाणा , दि. १८- जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आज मंगळवार, १७ जानेवारी रोजी संपल्या. रविवार, १५ जानेवारीपासून सुरु असलेल्या या स्पर्धांंमध्ये ५0 क्रीडा प्रकार व १0 सांस्कृतिक प्रकारांमध्ये १५00 पुरुष तथा महिला कर्मचार्यांनी सहभाग नोंदवून आपल्यातील सुप्त गुणांचा प्रत्यय दिला. स्पर्धांमध्ये मोताळा पंचायत समिती अव्वल तर बुलडाणा पंचायत समिती दुसर्या स्थानी आली. समारोप प्रसंगी आयकर अधिकारी विश्वास मुंडे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे तर जि.प.सीईओ दीपा मुधोळ या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत या क्रीडा स्पर्धांंमध्ये विविध विभागातील १५00 कर्मचार्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात सर्वाधिक बक्षिसे मोताळा पंचायत समितीने प्राप्त केली तर दुसर्या स्थानी बुलडाणा पंचायत समिती राहिली. कामातील ताण बाजूला सोडून उत्साह व चैतन्य वाढविण्यासाठी या क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी केले. सर्वप्रथम या क्रीडा स्पर्धांबाबत राजेश लोखंडे यांनी प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली. मध्यंतरी बंद पडलेले क्रीडा प्रकार पुन्हा बंद पडू नये, अशी अपेक्षा काही खेळाडूंनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त करताना मांडली. त्यानंतर बक्षीस वितरण झाले.
मोताळा पंचायत समिती अव्वल!
By admin | Published: January 19, 2017 2:30 AM